Omraje Nimbalkar sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar News : खासदार ओमराजे निंबाळकरांच्या शेतातच चोरी, नेमकं काय घडलं?

Akshay Sabale

Dharashiv Latest News, 25 May : राज्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. धाराशिव ( Dharashiv ) जिल्ह्यातही चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आधीच दुष्काळ त्यात चोरींच्या घटना वाढल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत. चोरट्यांकडून विद्युत पंप, केबल, आणि शेततातील साहित्यांची चोरी करण्यात येत आहे. याचा फटका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना देखील बसला आहे.

चोरट्यांनी ओमराजे निंबाळकर ( Omraje Nimbalkar ) यांच्या शेतीतील केबल चोरली आहे. याबाबत ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, खासदारांच्या शेतात चोरट्यांनी डल्ला मारल्यानं सगळीकडे चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमकं काय घडलं?

ओमराजे निंबाळकर यांची कोल्हेगाव शिवार येथे शेती आहे. या शेतातील विद्युतपंपाची 1200 रूपयांची केबल चोरट्यांनी चोरून नेली आहे. या चोरीनंतर अशोक साठे यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात वाहन चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. तर, पोलिस प्रशासनाकडून, अशा घटना घडून नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT