उस्मानाबाद : महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेचा इतका गैरवापर झाला की, त्याची जनतेत कसलीच इज्जत राहिलेली नाही. ईडीची इज्जत गावातल्या गणेश बिडी एवढी सुध्दा राहिली नसल्याचा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी लगावला. पाडोळी (ता.उस्मानाबाद) येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा (Ncp) पक्ष मेळावा आयोजीत करण्यात आलो होता. (Osmanabad)
यावेळी बोलतांना धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकार व तपास यंत्रणांवर चांगलेच तोंडसुख घेतले. मुंडे म्हणाले, सव्वा दोन वर्षापुर्वी 'होत्याचे नव्हत, व नव्हत्याचे होतं' झाल. २०१९ चा निकाल आठवतो संध्याकाळी चित्र स्पष्ट झाले,पक्षाचे आकडे आपण पाहत होतो. पण काहीच दिवसात होत्याचे नव्हत व नव्हत्याचे होते झाले हे सगळ शरद पवार यांनी करुन दाखविले.
माजी मुख्यमंत्र्याना वारंवार सांगुनही त्यांनी ऐकले नाही, पवार साहेबांचा नाद करू नका, पण त्यांनी केला आणि पुढे काय झाले हे तुमच्यासमोर असल्याचे सांगत मुंडे यानी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला. येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होणार आहेत त्यात भाजपची जिरविण्याची गरज असल्याचे अवाहनही त्यांनी यावेळी केले.
भारतीय जनता पक्षाच्या अंगातील माज अजुन गेलेला नाही. भल्या-भल्याच्या मागे तपासयंत्रणेचा ससेमिरा लावला जात आहे, ईडीची तर किंमत गावातल्या गणेश बिडीपेक्षा कमी झाली आहे. लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडविली जात आहेत, राज्याच्या महत्वाच्या संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने आपल्या महापुरुषावर केलेल्या वक्तव्ये आपण कसे सहन करणार?
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व सावित्री बाई फुले यांची बदनामी करणारी वक्तव्ये आता जनता सहन करणार नसल्याचा इशारा मुंडे यांनी दिला. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी जे राज्य उभ केले ते राज्य कधीच त्यांच्या नावांचे नव्हते, ते रयतेचे राज्य होते. हे रयतेचे राज्य, अठरापगड जातीचे राज्य आहे.
अशाचप्रकारे शरद पवार यांनी अठरा पगड जातीतल्या लोकांना संधी दिली. माझ्यासारख्या पडेल उमेदवाराला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली नसती तर आज हा धनंजय मुंडे तुमच्यासमोर दिसला नसता, असे कृतज्ञ उद्गारही मुंडे यांनी याववेळी काढले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.