Aurangabad : नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे प्रतिष्ठान हे निस्वार्थ भावनेने काम करत असते. ते जिथे जाऊन स्वच्छता किंवा इतर कामे करतात त्यांना काही द्यावे लागत नाही, गाड्या पाठवाव्या लागत नाही, खुर्च्या टाकाव्या लागत नाही. Maha Swachata Abhiyan ते खाली चटईवर बसतात, आपल्या सोबत आणलेलंच जेवतात. नानासाहेब, अप्पासाहेब आणि त्यांच्या श्री सदस्यांचे कार्य हे देव, देश आणि धर्म या त्रिसुत्रीवर चालते. जे सरकार करू शकत नाही ते हे प्रतिष्ठाण करते.
मी देखील या परिवाराचा सदस्य आहे. त्यामुळे हे सरकार देखील देव, देश आणि धर्म या त्रिसुत्रीवर काम करणारे आपले सरकार, असल्याचा उल्लेख (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नानासाहेब प्रतिष्ठाणच्या वतीने आज शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री शिंदे हे (Aurangabad) औरंगाबादेत आले होते.
यावेळी अभियानाला शुभेच्छा देतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे महापालिकेने नानासाहेब प्रतिष्ठाणच्या सहकार्यातून मोठी स्वच्छता मोहिम राबवली होती. तेव्हा आणि त्याच्याही आधीपासून माझा या प्रतिष्ठाणशी नानासाहेब, अप्पासाहेब यांच्यांशी संपर्क आला आहे. या प्रतिष्ठाणचे काम हे निस्वार्थ भावनेने देश, राज्य आणि धर्माप्रती असलेल्या प्रेमापोटी असते. मैदान, रस्ते, उद्याने, गल्लीबोळात जेव्हा जेव्हा प्रतिष्ठाणने स्वच्छता मोहिम राबवली तिथे साधी काडीसुद्धा दिसत नाही.
यासाठी श्री सदस्यांचे लाखो हात परिश्रम घेत असतात. जिथे शासन पोहचू शकत नाही, तिथे प्रतिष्ठाण आणि त्यांचे सदस्य पोहचतात. वृक्षारोपण हा देखील एक मोठा आणि चांगला प्रकल्प प्रतिष्ठाणकडून राबवला जातो. अगदी रोप लावल्यापासून त्याला पाणी, खत देणे आणि त्याची निगा राखणे या सगळ्या गोष्टी प्रतिष्ठाणकडून केल्या जातात. आज देखील शहरातील महास्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून साडेसातशे टन कचरा गोळा करण्यात येणार आहे.
त्यांच्या या अभियानाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. देव, देश आणि धर्मासाठी हे प्रतिष्ठाण काम करते. त्याच प्रमाणे राज्यातील हे सरकार देखील या त्रिसुत्रीवर काम करत आहे. माझ्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेला हे आपलं सरकार आहे, असा विश्वास निर्माण झाला आहे. या राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी कायम झटणारे हे आपले सरकार असल्याचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.