Mla Prashant Bamb-Satish Chavan News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : हा तर कटाचा भाग, बंब यांना पंधरा वर्षात मुद्दा का सुचला नाही?

शिक्षकांना त्यांनी ग्रामीण भागात सुविधा मिळवून देण्यासाठी सरकारशी भांडल पाहिजे, सुविधा नसतील तर शिक्षक मुख्यालयी कसे राहतील? (Mla Satish Chavan)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा उपस्थितीत केला. खर पाहिलं तर (Prashant Bamb) बंब हे पंधरा वर्षापासून आमदार आहेत, पण त्यांना शिक्षकांच्या मुद्दा आत्ताच म्हणजे पंधरा वर्षांनी कसा सुचला हा खरा प्रश्न आहे. (Teacher) आमदार कपिल पाटील म्हणाले, तसा हा एका मोठ्या कटाचा भाग असू शकतो, असा आरोप मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थिती केला होता. त्यानंतर शिक्षक विरुद्ध बंब असा संघर्ष सुरू आहे. (Marathwada) यातच बंब यांनी शिक्षक व पदवीधर आमदारांची गरज नाही, त्यांचे मतदारसंघ रद्द करा, अशी खळबळजनक मागणी केली होती. याविरोधात आज औरंगाबादते शिक्षक व पदवीधर आमदारांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी बंब यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला. चव्हाण म्हणाले, पंधरा वर्षापासून म्हणजेच तीन टर्मपासून बंब हे आमदार आहेत. मग त्यांना शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा आताच कसा उपस्थीत करावासा वाटला. शिक्षकांना त्यांनी ग्रामीण भागात सुविधा मिळवून देण्यासाठी सरकारशी भांडल पाहिजे, सुविधा नसतील तर शिक्षक मुख्यालयी कसे राहतील?

त्यामुळे त्यांच्यासाठी रस्त्यावर येणे हे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचे कामच आहे. संविधानाच्या विरोधात भूमिका घेण्याचे कामच सध्या बंब यांचा भाजप हा पक्ष करत आहेत. त्यामुळे बंब यांनी शिक्षक व पदवीधर मतदारसंघ रद्द करण्याची मागणी केली आहे. केंद्रात सरकार असल्यामुळे ते असा निर्णय देखील घेऊ शकतील, अशी भिती देखील चव्हाण यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT