Ncp Leader News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ncp : नेत्याच्या मुलाच्या लग्नात जेवणातून विषबाधा, पण आकडा ऐकून वरबाप अवाक..

Marathwada : हजार लोकांपैकी फक्त २० ते २५ जणांना त्रास झाला. सातशेचा आकडा सांगणाऱ्यांनी रुग्णालयात जावून माहिती घ्यावी.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांच्या मुलाचा नुकताच विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला हजारावर वऱ्हाडी मंडळी जमली होती. (Aurangabad) उभयंताना शुभेच्छा दिल्यानंतर मेजवाणीचा अस्वाद वऱ्हाडींनी घेतला. पण काहीवेळानंतर अनेकांना पोटदुखी, मळमळ, अतिसाराचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे काहींना रुग्णालायत भरती केले गेले, तर काहींवर प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले.

पण या जेवणावळीतून तब्बल सातशे जणांना विषबाधा झाल्याचा आकडा वरबाप असलेल्या कदीर मौलांनाच्या कानी पडला आणि ते अवाक झाले. (Aurangabad) रुग्णालायत दाखल वऱ्हाडींची विचारपूस आणि त्यांना भेटून आल्यानंतर आज मौलाना यांनी या आकड्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. (Ncp) सातशेचा आकडा आणला कुठून, मला बदनाम करण्याचा हा राजकीय डाव तर नाही ना? अशी शंका देखील उपस्थितीत केली.

तसेच हजार लोकांपैकी फक्त २५ ते ३० जणांना त्रास झाल्याचा दावा करत सातशेचा आकडा सांगणाऱ्यांनी रुग्णालयात जावून माहिती घ्यावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला. जेवणामध्ये ठेवण्यात आलेल्या नेमक्या कोणत्या पदार्थातून विषबाधा झाली याचा शोध आणि पदार्थाची तपासणी आम्ही करत आहोत, असेही कदीर मौलाना यांनी स्पष्ट केले.

आम्ही राजकीय मंडळी आहोत, त्यामुळे विरोधक संधीच्या शोधात असतात, या निमित्ताने ती त्यांनी साधली, असा टोला देखील त्यांनी लगावला. लग्नामध्ये हजारो नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट सहभागी झाले होते. त्यापैकी २५ ते ३० जणांनाच हा त्रास झाला. जेवणात काही दोष असता तर इतरांना देखील त्रास झाला असता. पण तसे घडलेले नाही, तरी देखील हे का घडले यांचा शोध आम्ही घेत आहोत, असेही मौलाना यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT