Minister Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : माझ्या मतदारसंघात मोठ्या लोकांच्या जमिनी; संजय शिरसाट यांनी नावचं घेतली!

Sanjay Shirsat has stirred political attention by revealing that several top leaders own land in his constituency, going a step further to publicly name them. : आपल्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या लोकांचा वावर आणि सहवास आपल्याला लाभत आला आहे. निवडणुकीत या लोकांची आपल्याला मदतही होत असते.

Jagdish Pansare

Beed Political News : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची गाडी सध्या सुसाट सुटली आहे. बीड जिल्ह्याचे संपर्क मंत्री झाल्यानंतर त्यांनी नुकताच या जिल्ह्याचा दौरा केला. त्यांच्या उपस्थितीत बीडमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. तर माजलगावमध्ये त्यांचा सामाजिक न्याय मंत्री झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात संजय शिरसाट यांनी केलेल्या भाषणाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

माझ्या मतदारसंघात कोणत्या कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या जमीनी आहेत, हे शिरसाट यांनी जाहीरपणे सांगून टाकले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके (Prakash Solanke) हे ही व्यासपीठावर उपस्थितीत होते. त्यांचीही जमीन आपल्या मतदारसंघात असल्याचा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. शिरसाट यांनी आपल्या भाषणात आठ ते दहा आजी-माजी मंत्री, आमदारांची नावे घेत त्यांच्या जमीनी आपल्या मतदारसंघात असल्याचा दावा केला.

हे सांगण्यामागे आपण साधेसुधे नाहीत, तर आपल्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या लोकांचा वावर आणि सहवास आपल्याला लाभत आला आहे. निवडणुकीत या लोकांची आपल्याला मदतही होत असते, अशी कबुलीही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावेळी दिली. आपल्या भाषणात शिरसाट म्हणाले, मी माझ्या मतदारसंघातून चार वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. माझ्या विरोधात अनेक मोठे लोक उभे राहतात, पण मी काही साधा माणूस नाही.

माझ्या मतदारसंघात तुमच्या प्रकाशदादा सांळुंकेची जमीन आहे. राधाकृष्ण विखे पाटील, सतीश चव्हाण, बाळासाहेब थोरात, राजेंद्र दर्डा, जयदत्तअण्णा क्षीरसागर, कदमसाहेबांची जमीनही माझ्याच मतदारसंघात आहे. मी हलकासलका माणूस नाही. राजस्थानचे राज्यपालही माझ्या मतदारसंघात राहतात. चाळीस वर्षाच्या राजकारणात मी काय कमावलं तर लोकांच प्रेम कमावलं. या जिल्ह्याचा संपर्कमंत्री म्हणून माझ्याकडे कोणतही चांगल काम घेऊन या, हा संजय शिरसाट तुम्हाला रिकाम्या हातानी पाठवणार नाही, ही गॅरंटी देतो.

काय मागायचं ते मोठं मागा, मला जे मिळालंय ते वाटून टाकण्यासाठी आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझ्यासारखे चार-पाच जण उभे होतो, म्हणून ते खंबीरपणे उभे राहिले आणि या राज्याचे त्यांनी नेतृत्व केले, असेही शिरसाट म्हणाले. माझ्या मतदारसंघात सर्वाधिक कंपन्या आहेत, बांधकाम व्यवसायिक आहेत, पण मी कधी कोणाला त्रास दिला नाही, कोणाला पैसे दिले नाही. तुमच्याकडे एकच कंपनी होती, तर एवढं घडलं. मला कधी हे सुचलं नाही, बरं झालं सूचलं नाही, अस टोलाही शिरसाट यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT