Mla Rajesh Tope In marriage ceremony News
Mla Rajesh Tope In marriage ceremony News Sarkarnama
मराठवाडा

Mla Rajesh Tope In marriage ceremony : टोपेंची दिवसभरात अकरा लग्न समारंभात हजेरी, पंगतीही वाढू लागले..

सरकारनामा ब्युरो

Jalna : राजकारणात प्रदीर्घ काळ टिकायचे असेल तर मतदारसंघातील लोकांच्या सुख, दुःखात सहभागी झाले पाहिजे, हा नियम बहुतांश राजकारणी पाळतात. (Mla Rajesh Tope In marriage ceremony) त्यासाठी कितीही प्रवास, पायपीट करावी लागली तरी नेते मंडळी ती करतात. अगदी लग्नाचा मुहूर्त साधता आला नाही, तरी उशीरा का होईना, ज्यांच्या घरी कार्य आहे, तिथे हजेरी लावून ते शुभेच्छा देतातच.

राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा घनसावंगीचे विद्यमान आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) सध्या मतदारसंघातील लग्न समारंभांना आवर्जून हजेरी लावतांना दिसत आहेत. (Jalna) दिवसभरात थोड्याथिडक्या नाही तर तब्बल ११ लग्नांना हजेरी लावत त्यांनी वधु-वरांना शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नाही तर पंगतीत हातात टोपले घेवून ते वाढपीच्या भूमिकेतही दिसून आले.

२००९ ते २०१९ अशा सलग तीन टर्मपासून टोपे घनसांवगी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. (Ncp) राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतांना कोरोनाचे संकट आले होते. तेव्हा आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम आजही लोकांच्या स्मरणात आहे. मतदारसंघातील नागरिकांची तेव्हा टोपे यांनी विशेष काळजी घेतली होती.

सध्या लग्नसराई सरू आहे, अशावेळी सर्वसामान्य नागरिकांपासून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या कुटुंबात एखादे लग्न असेल तर तिथे आवर्जून हजेरी लावावीच लागते. अगदी एकाच दिवशी वेगवेळ्या ठिकाणी, गावात लग्न सोहळे असले तरी तिथे भेट देणे आवश्यकच असते. टोपे यांनी घनसांवगी आणि अंबड तालुक्यातील एकाच दिवशी असलेल्या अकरा लग्नांना हजेरी लावली आणि वधु-वरांना शुभेच्छा दिल्या. एवढेच नाही, तर एका लग्नाच्या पंगतीत स्वतः हातात टोपले घेवून त्यांनी वऱ्हाडी मंडळींना वाढूनही दिले. वाढप्याच्या भूमिकेत टोपे यांना पाहून त्यांच्या समर्थकांना अधिकच आनंद झाला.

टोपे यांनी उध्दवसिंह पवार रा.घुंगर्डे हादगाव मुलाचे लग्न, सतिष फोके रा.झिर्पी मुलाचे लग्न,बालासाहेब कचरे रा.धनगरपिंप्री मुलीचे लग्न,बप्पासाहेब बहिर रा.एकलहेरा ता.अंबड मुलाचे लग्न. तसेच लक्ष्मण झुटे रा.देवनगर मुलीचे लग्न,निलेश सुरासे रा.भेंडाळा मुलीचे लग्न,भरत साबळे रा.कोठाळा बु.मुलाचे लग्न,सुर्यकांत कोल्हे रा.सरफगव्हाण मुलीचे लग्न,सुरेश राठोड रा.घोन्सी तांडा मुलीचे लग्न,युवराज आर्दड रा.बोलेगाव ता.घनसावंगी मुलीचे लग्न,दिगंबर मार्गे रा.जालना मुलीचे लग्न,मधुकर हिवाळे रा.हिस्वण मुलीचे लग्न व गौतम मुनोत रा.जालना आदी समारंभांना उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT