Marathwada sahitya sammelan News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Marathwada News : साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे; चव्हाण, पंकजाही येणार..

पहिल्यांदाच मराठवाड्यातील राजकीय चित्र- दशा आणि दिशा या विषयावर परिसंवाद होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Jalna News : घनसांवगी येथे १० व ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. तर या निमित्ताने होणाऱ्या परिसंवादात राजकारणाची दशा आणि दिशा सांगण्यासाठी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या देखील हजेरी लावणार आहेत.

ऐरवी साहित्य संमेलनात राजकारण्यांना बोलवू नका असा साहित्यिकांचा सूर असतो. परंतु यावेळी मात्र मराठवाडा (Marathwada) साहित्य संमेलनात राजकारणाची दशा आणि दिशा असा विषय ठेवल्यामुळे येथे राजकारण्यांची मांदियाळी दिसणार आहे. स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी पत्रकार परिषदेत संमेलनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.

घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. अध्यक्षस्थपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते असतील. १० डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरवात होईल. तर साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

कथाकथन, परिसंवाद, कविता वाचन, प्रकट मुलाखत अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी रसिकांना मिळणार असून यात पहिल्यांदाच मराठवाड्यातील राजकीय चित्र- दशा आणि दिशा या विषयावर परिसंवाद होणार आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे या परिसंवादाचे अध्यक्षपद भुषवणार आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील यात सहभाग असणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची देखील यावेळी उपस्थिती असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT