Chhatrapati Sambhajinagar News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी(ता.17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. यावेळी फडणवीस सरकार, चालू राजकीय घडामोडी, शेतकऱ्यांच्या अडचणींसह विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं पाहिजे, असं मोठं विधान केलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, एक काळ असा होता देशाचा पंतप्रधान मराठवाड्याचा होईल असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र,प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे गेले, जे सत्तेचा उपभोग सुद्धा घेऊ शकले नाहीत. गोपीनाथ मुंडेंचाही रहस्यमय मृत्यू झाला,त्यांनी मराठवाड्यातील अनेक प्रश्न मांडले. त्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं पाहिजे असंही ठाकरे म्हणाले.
त्यावर आता काँग्रेस नेते नाना पटोले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्यासंदर्भातही विधानसभेत आम्ही सातत्याने भूमिका मांडल्याचं वास्तव सांगितलं. मात्र, इतका आवाज उठवूनही साधा FIR सुद्धा दाखल होऊ शकला नाही. अजितदादांच्या मृत्यूत नेमकं काय दडलेलं आहे, असं नाना पटोले म्हणाले.
तसेच नाना पटोले यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत उद्धव ठाकरेंनी शंका उपस्थित केल्यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख उद्धव ठाकरे साहेबांनी केला. मुंडेसाहेब मोठे नेते होते. त्यांचा अपघाताने मृत्यू झाला की,घातपाताने असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या शंकेला आणखी हवा देण्याचा प्रयत्न केला. मुंडेंच्या मृत्यूची सरकारने चौकशी करावी. म्हणजे दूध का दूध,पानी का पानी होऊन जाईल असंही काँग्रेसच्या पटोलेंनी म्हटलं.
राज्यात गेल्या दिवसांपासून पुन्हा एकदा गाजत असलेल्या दिशा सालियान प्रकरणावरुनही टीकेची तोफ डागली. तसेच विरोधकांनाही कडक इशारा दिला. ते म्हणाले, दिशा सालियन मृत्यू दुर्दैवी आहे, पण या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नाही. आम्ही तिला ओळखत देखील नाही. तरीही सीबीआयच्या एफआयआरमध्ये माझे, आदित्यचे नाव टाकले गेले. हा राजकीय षडयंत्राचाच भाग आहे. त्यांना काय करायची ती चौकशी करू द्या? असं आव्हानही त्यांनी सरकारसह सीबीआयला दिलं.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात जे चारित्र्यहनन गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे, ते आता थांबले पाहिजे, अन्यथा मला कायदेशीर पाऊल उचलावे लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्या, या प्रकरणात तुमच्यापैकी कोणाचेही नाव येऊ शकते? असे पत्रकारांना म्हणत उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावर आपण आतापर्यंत काहीच बोललो नाही. पण यापुढे चारित्र्य हनन खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.