Chandrakant Khaire-Devendra Fadanvis News, Aurangabad
Chandrakant Khaire-Devendra Fadanvis News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : उद्धव ठाकरे प्रामाणिक, तुम्हीच धोका दिला म्हणून उपमुख्यमंत्री व्हावे लागले..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत. धोका, बेईमानी त्यांच्या रक्तातच नाही ते प्रामाणिक आहेत. उलट २०१४ आणि २०१९ ला तुम्हीच त्यांना धोका दिला असा पलटवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. त्यामुळे नुकसान तुमचेच झाले आज तुम्हाला मुख्यमंत्री पदा ऐवजी उपमुख्यमंत्री म्हणून शांतपणे काम करावे लागत आहे, असा टोला देखील खैरेंनी लगावला.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेले मंत्री, आमदार शिवाजीपार्कवर दर्शनासाठी गेले होते. (Devendra Fadanvis) या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत प्रसार माध्यमांशी बोलतांना (Chandrakant Khaire) खैरेंनी त्यांचा उल्लेख गद्दार असा करत गद्दारीबद्दल आधी माफी मागा, मन स्वच्छ ठेवा आणि मग बाळासाहेबांच्या दर्शनाला जा, असा सल्लाही दिला.

खैरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली, शिवसेना फोडली ते भविष्यात पुन्हा उभे राहू शकले नाहीत, हा इतिहास आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणात शिवसैनिक म्हणून आपल्या सगळ्यांकडून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना सांभाळण्याचे वचन घेतले होते. ते काही वर्ष तुम्ही पाळले पण आता गद्दारी करून शिवसेना फोडण्याचे पाप केले. बाळासाहेबांच्या विचारांशी ही प्रातारणा नाही का? बाळासाहेबांना हे कधी आवडले असते का?

मग शिवाजी पार्कवर जाऊन साहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन काय करणार? त्यापेक्षा केलेल्या गद्दारीची माफी मागा आणि स्वच्छ मनाने बाळासाहेबांचे दर्शन घ्या, असा टोला देखील खैरेंनी लगावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत धोका दिल्याचा बदला घेतल्याचे विधान करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

यावर देखील खैरे यांनी सडेतोड उत्तर दिले. धोका उद्धव ठाकरेंनी नाही तर तुम्ही त्यांना दिला. एकदा नाही, तर दोनदा दिला. पण त्यामुळे काय झाले तर तुम्हालाच मुख्यमंत्री पदा ऐवजी उपमुख्यमंत्री बनावे लागले. उद्धव ठाकरे हे प्रामाणिक आहेत, ते कधीच कोणाला धोका देत नाहीत, असेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT