उद्धव ठाकरे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर असून ते ८ जिल्ह्यांतील २२ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यात सुमारे ८०० शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकण्याचा ठाकरे यांचा मानस आहे.
या दौऱ्यामुळे मराठवाड्यातील राजकीय तापमान वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते.
Shiv sena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. दगाबाज सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात चार दिवसात उद्धव ठाकरे तब्बल 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी गेल्या महिन्यात मराठवाड्याचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हंबरडा' मोर्चा काढला होता.
त्यानंतर महिनाभरातच उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टी, महापूरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. महायुती सरकारने 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान जमा करण्यात येईल, असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रत्यक्षात दिवाळी उलटून गेली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.
या पार्श्वभूमीवर महायुती सरकार 'दगाबाज' असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे कर्जमुक्ती आणि नुकसान भरपाईचे अनुदान तातडीने मिळावे यासाठी पुन्हा आक्रमक पवित्र घेत रस्त्यावर उतरणार आहेत. या आधीचा उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा एका दिवसाचा होता. यामध्ये त्यांनी पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली होती. यावेळी मात्र त्यांचा दौरा चार दिवसांचा असणार आहे.
हो संवाद साधण्यासाठीच दौरा
उद्धव ठाकरेंच्या या मराठवाडा दौऱ्यावर सत्ताधारी पक्षाकडून टीका होत असताना शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आमचा दौरा शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठीच आहे. कर्जमुक्तीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला राजकारण करू नको, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किंवा कर्जमुक्ती करा अशी मागणी राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे करणाऱ्या शेतकऱ्याला याला मुख्यमंत्री करा, असे म्हणत टिंगल उडवणाऱ्या अजित पवारांना शेतकऱ्यांचे दुःख आणि अश्रू कसे कळणार? असा सवाल दानवे यांनी केला.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि संपूर्ण कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या दौऱ्याच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी अंबादास दानवे यांनी नुकताच काही जिल्ह्यांचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांचा महिनाभरातला दुसरा मराठवाडा दौरा होत असतानाच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.
1. उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा किती दिवसांचा आहे?
हा दौरा चार दिवसांचा असून ८ जिल्ह्यांचा समावेश आहे.
2. उद्धव ठाकरे या दौऱ्यात कोणाशी भेटणार आहेत?
ते सुमारे ८०० शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
3. या दौऱ्यात कोणते जिल्हे समाविष्ट आहेत?
छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना आणि धाराशीव हे प्रमुख जिल्हे आहेत.
4. या दौऱ्याचा उद्देश काय आहे?
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे आणि पक्षाची पकड मजबूत करणे हा मुख्य हेतू आहे.
5. या दौऱ्यामुळे कोणत्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे?
या दौऱ्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेची ताकद पुन्हा वाढण्याची आणि राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.