Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंची गाडी अडवली अन् सुपाऱ्याही फेकल्या; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

MNS Maharashtra : बीडमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्यापूर्वीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे चले जाव च्या घोषणा दिल्या.

Sunil Balasaheb Dhumal

Beed Political News : मनसे प्रमुख राज ठकारे सध्या मराठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते बीडमध्ये आहेत. बीडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray पक्षांच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्याही फेकण्यात आल्या. यावेळी राज ठाकरे चले जाव, तसेच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray शुक्रवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते बीडमध्ये दाखल होताच ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा झाला आहे. येथील जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती. त्या परिसरात ते दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाला.

राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी शिवसैनिकांनी राज ठाकरे चले जाव, अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांच्या वाहनांवर सुपाऱ्याही फेकण्यात आल्या. दरम्यान, या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलिस यंत्रणा अॅक्टिव्ह झाली असून मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आरक्षणावर राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या हव्यात यात जातीचा मुद्दा कुठे येतो? आज खासगीकरण मोठे आहे, आणि खाजगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आरक्षणाने खरेच शिक्षणातील असो की नोकऱ्यातील असो किती लोकांना फायदा होणार आहे, याचा विचार आपण करणार आहोत का?

येथे फक्त माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. मतांचे राजकारण सुरू आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मुलामुलींना आपल्याकडच्या शिक्षणसंस्थांमध्ये अॅडमिशन्स मिळतात, पुढे त्यांना नोकऱ्या मिळतात. पण आपल्या मुलांना मिळत नाहीत, यावर कोणी बोलत नाहीत. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीपातीत अडकला आहे, अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT