Chhatrapati Sambhjainagar news : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi NewS) संयुक्त सभा होत आहे. या सभेला वज्रमूठ (Vajramuth Sabha) सभा असे नाव देण्यात आले आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रांतअध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहिले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील दहा प्रमुख मुद्दे :
संभाजीनगर नामांतर :
हेच ते मैदान आहे आणि हेच ते शहर आहे, १९८८ वर्षी संभाजीनगरची महापालिका शिवसेनेच्या हातात दिली. येथेच याच मैदानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या शहराचं नाव आजपासून संभाजीनगर करतोय, असं जाहीर पणे म्हटलं होतं. यानंतर जे काही घडलं ते आपण पाहिलं. मात्र महाविकास आघाडीच्या काळात आपण संभाजीनगर असं नामांतर करू शकलो, याचा अभिमान आहे.
सावरकर गौरव यात्रा :
सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख ठाकरेंनी केला. यात्रा जरूर काढा. ते हिंदू जनआक्रोश पण सुरू झालाय. मुंबईत मोर्चा काढला होता यांनी. शिवसेना भवनपर्यंत हा मोर्चा आला. याचा अर्थ असा होतो, विश्वातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाला असेल, आणि त्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागत असेल तर, लाज वाटायला पाहिजे.
हिंदुत्व सोडल्याच्या आरोप :
माझ्यावरती हिंदुत्वाच्या आरोप करत आहेत. पण मी तुम्हाला विचारतो की, मी हिंदुत्व सोडलं का? आम्ही जर काँग्रेससोबत गेलो म्हणून मी हिंदुत्व सोडतो असं म्हणत असाल, तर तेव्हा मेहबूबा मुफ्तीसोबत काश्मीरमध्ये सरकार स्थानन केलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का?
नरेंद्र मोदींच्या पदवीवर टीका :
महाराष्ट्रात लाखो युवक आहेत. त्यांनी कर्ज काढून पदव्या मिळवल्या. अलीकडच्या काळात डॉक्टरेटही विकत घेता येते. काही जण पाण्याचं इंजे्क्शन घेऊन फिरतात. अनेकांच्या पदव्यांना किंमत नाही. मात्र कोणी पंतप्रधान मोदींची पदवी दाखवा म्हंटलं तर २५ हजारांचा दंड बसतो. पंतप्रधान मोदी ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना अभिमान का वाटू नये. त्यांची पदवी मागितली तर दाखवणार नाहीत, या पदवीचा उपयोग काय? दंड भरण्यासाठी त्याचा उपयोग होतो का?
अमित शहांवर वार :
अमित शाह मध्यंतरी म्हणाले, शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. आम्हाला काय़ जमीन दाखवताय, जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त जमीन घेऊन दाखवा. सरदार वल्लभाई पटेलांचा मोठा पुतळा उभा केला आहे. वल्लभभाई नसतेच तर आज मराठवाडा मु्क्ती झाली असती का? धाडस दाखवून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य का घुसवत नाही? घुसवा की फौजा.
बाळासाहेबांचं नाव सोडणार नाही :
आज माझ्या हातात काहीच नाही. ज्यावेळेला भाजपला काडीची किंमत नव्हती, तेव्हा भाजपला बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली. आज भाजपसोबतजुने सहकारी नाहीत. शिवसेना नाही, अकाली दल नाही. गरज होती तेव्हा वापरून घेतलं. आता लाथा मारत आहेत. आज त्यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चोरलं. इतकंच नाही तर माझे वडीलांना चोरण्याचा प्रयत्न त्यांनी चालावलाय. पण मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. मी भाजपल इथे आव्हान देतो. असेल हिंमत तर मोदींनी इथे यावं आणि त्यांच्याच चेहरा वापरून, त्यांच्या नावाने मतं मागावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.