Sandipan Bhumre, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Sandipan Bhumre, Eknath Shinde, Uddhav Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : मुलाला, नातवाला जमले नाही, ते कडवट शिवसैनिकाने करून दाखवले..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते, उद्धव ठाकरे मुंख्यमंत्री तर आदित्य मंत्री होते. पण त्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असलेल्या मुलाला आणि मंत्री असलेल्या नातवाला जे जमलं नाही, ते एका कडवट शिवसैनिकाने करून दाखवले, असा टोला रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी ठाकरे पिता-पुत्रांना लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते आज विधीमंडळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या तैलचित्र अनावरण समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव नसल्यामुळे राजकारण रंगले होते. काल औरंगाबादेत असलेल्या आदित्य ठाकरे यांनी ` माझे अजोबाही म्हणत असतील गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राचे अनावरण होत आहे` अशी टीका केली होती.

यावर आज बाळासाहेबांच्या जयंती दिनी शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव व आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला. संदीपान भुमरे म्हणाले, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि मंत्री असताना आदित्य ठाकरेंना विधानभवनात तैलचित्र लावायचे सुचले नाही, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या एका कडवट शिवसैनिकाने करुन दाखवले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तर नातू आदित्य ठाकरे मंत्री होते. मात्र त्यांना सुचले नाही की, आपल्या वडिलांचे, आजोबा बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लावावे. याचेच खरे दुःख बाळासाहेबांना होत असेल. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंना जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तैलचित्र लावून करून दाखवले. एकनाथ शिंदे आणि आम्हीच खरे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार असल्याचेही भुमरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT