Sanjay Shirsat-Sanjay Raut News
Sanjay Shirsat-Sanjay Raut News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Sanjay Raut : बस्स झालं, राऊत नावाचा भोंगा बंद केला नाही, तर शिरसाट नाव सांगणार नाही..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्याच्या राजकारणात सध्या दोन `संजय`, यांची रोज चर्चा होत असते. एक राज्यसभेचे खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, तर दुसरे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट. (Sanjay Shirsat On Sanjay Raut) या दोघांच्या आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवरील टीकेमुळे लोकांचे मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीका, आरोपांवरून प्रश्न विचारला की संजय शिरसाट आता चिडू लागले आहेत.

असंच माध्यमांनी शिरसाटांना राऊतांबद्दल विचारले तेव्हा, आता बस्स झाले, संजय राऊत यांचा भोंगा कायमचा बंद केला नाही, तर (Sanjay Shirsat) संजय शिरसाट नाव सांगणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. मुंबईतील बाळासाहेब भवनात आपण संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात जोरदार धमका करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे आता राऊतांविरोधात शिरसाट काय धमाका करतात ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना विविध प्रश्नानांना उत्तरे दिली.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुक शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर आणि भाजपसोबतच लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. (Shivsena)

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार हा दावा खोडून काढतांना जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे असलेल्या इच्छूकांची काळजी करावी, अन्यथा त्यांचेच उमेदवार भाजपकडून लढतांना त्यांना पहावे लागतील. स्वतः जयंत पाटील हेच भाजपमध्ये येण्यास इच्छूक होते हे काही लपून राहिलेले नाही. याबद्दल अजित पवार अधिक चांगल सांगू शकतील, असा चिमटा देखील शिरसाट यांनी काढला.

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय दृष्टीने बघू नये, ते ऐकमेकांचे चांगेल मित्र आहेत. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरेंना भेटतील. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काॅंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आयुष्यात कधी जाणार नाही हे सांगितले होते. त्या काॅंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर उद्धव ठाकरे गेले, ते कुणाला खटकतं नाही. मग फडणवीस राज ठाकरेंना भेटले तर त्यात वावगं काय? असा सवालही शिरसाट यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT