Umarga Bazar Samiti
Umarga Bazar Samiti Sarkarnama
मराठवाडा

Umarga Bazar Samiti: उमरगा बाजार समितीच्या सभापतीपदी रणधीर पवार तर उपसभापतीपदी राजेंद्र तळीखेडे

अविनाश काळे

Dharashiv News: उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड आज बिनविरोध पार पडली. यामध्ये सभापतीपदी महाविकास आघाडीचे रणधीर पवार यांची तर उपसभापतीपदी राजेंद्र तळीखेडे यांची निवड झाली आहे.

सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीची प्रक्रिया प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक मधुकर गुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२३) पार पडली. यावेळी विशेष सभा झाली.

यामध्ये सभापतीपदासाठी रणधीर पवार यांचे नाव बसवराज कस्तुरे यांनी सूचवले. त्याला प्रल्हाद काळे यांनी अनुमोदन दिले. पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना सभापती म्हणून घोषीत करण्यात आले.

उपसभापती पदासाठी कृष्णा माने यांनी राजेंद्र तळीखेडे यांचे नाव सूचवले. त्याला सिद्धाराम हत्तरगे यांनी अनुमोदन दिले. त्यांचाही एकमेव अर्ज आल्याने राजेंद्र तळीखेडे यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीनंतर महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील यांच्या हस्ते सभापती पवार आणि उपसभापती तळीखेडे यांचा सत्कार करण्यात आला.

या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक 11 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. महाविकास आघाडीतून सभापतीपदी काँग्रेसचा होईल, असा अंदाज होता. पण महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) पवार यांचा विचार केला.

दरम्यान, पवार यांच्या माध्यमातून निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळाला. पण या निवडीने शिवसेनेच्या शिंदे गटाला एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. तळीखेडे यांचा गत निवडणुकीनंतरच्या उपसभापती निवडीवेळी अंतर्गत दगाफटका सहन करावा लागला होता. मात्र, यावेळी ज्यांनी दगाफटका केला त्यांना इशारा देत तळीखेडे उपसभापती झाले.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT