Beed APMC Election News Sarkarnama
मराठवाडा

Beed APMC Election : काका जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्याकडून धोबीपछाड ; बाजार समिती हिसकावली..

Mla Sandip Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर यांना फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : गेल्या अनेक वर्षापासून बीड बाजार समितीवर (Beed APMC Election) एकहाती सत्ता असलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी १५ जागा जिंकत काकांचे संस्थान खालसा केले.

जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांची बाजार समितीतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी भाजप, ठाकरे गटाला सोबत घेत महाविकास आघाडीची मोट बांधली होती. यानंतरही जयदत्त क्षीरसागर सत्ता कायम राखतील अशी चर्चा होती. मात्र पुतण्याने पुन्हा एकदा काकाला दणका दिल्याचे निकालावरून दिसून आले आहे.

बाजार समितीचा निवडणूक प्रचार चांगलाच गाजला होता. जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यावर वसुली, टक्केवारीचा आरोप केला होता. (Beed News) तर त्यांच्यासोबत असलेल्या ठाकरे गटाचे, व भाजपचे जिल्हाप्रमुख यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर मतदारांना धमकावल्याची तक्रार देखील जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनलमधील उमेदवाराने संदीप क्षीरसागर व इतरांविरुद्ध केली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर १८ पैकी १५ जागांवर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनले विजय मिळवला. तर जयदत्त क्षीरसागर यांना फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले.

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका पाहता बाजार समितीत सत्ता कायम राखत कमबॅक करण्याच्या तयारीत जयदत्त क्षीरसागर होते. मात्र बाजार समितीतील सत्ता देखील त्यांच्या हातून गेल्याने त्यांची पुढची वाट अधिकच बिकट बनल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर देखील बाजार समितीची सत्ता मतदारांनी त्यांच्या हातात सोपवल्याने हा त्यांचा मोठा विजय असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT