औरंगाबाद : कोरोना महामारीनंतर मांडण्यात आलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य लोकांना खूप अपेक्षा होत्या. (Union Budget) देशात बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढलेली आहे, शेतकरी अडचणीत आहे, त्यांना यंदा तरी काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaramn) यांनी समाजातील सर्वच घटकांना ठेंगा दाखवला आहे, अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Mp Imtiaz Jalil) यांनी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली.
क्रिप्टो करन्सीवर कुठलीही चर्चा न करता त्याला देशात लागू करण्याचा आणि त्यावर ३० टक्के कर आकारण्याचा निर्णय तर धक्कादायकच आहे, असेही ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आत्मनिर्भर करणारा, वेगाने प्रगतीकडे नेणारा असल्याचे सांगत भाजपकडून अर्थमंत्री, पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका करत देशाची निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. औरंगाबादचे खासदार एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील अर्थसंकल्पावर तिखट प्रतिक्रिया दिली. इम्तियाज जलील म्हणाले, कोरोना महामारीमुळे देशातील सर्वसामान्य व्यक्तीचे कंबरडे मोडले आहे. बेरोजगारीमुळे तरूण परेशान आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे, तर पेट्रोल-डिझेल-गॅसमुळे भडकलेल्या महागाईचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसत आहे.
या अर्थसंकल्पात त्यावर तोडगा काढला जाईल, महागाई कमी करण्यावर काही निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती. पण अर्थमंमत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील तरूण, शेतकरी, सामान्यांना ठेंगा दाखवला असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. कोरोना महामारीनंतर देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची गरज असतांना या सरकारने पुन्हा एकदा मोठी स्वप्न दाखवण्याचे काम केले आहे.
क्रिप्टो करन्सी देशात आणण्याचा तडकाफडकी घेतलेला निर्णय आणि त्याची थेट संसदेत घोषणा करण्याचा प्रकार तर अत्यंत धोकादायक आहे. या विषायवर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतलेला हा निर्णय भविष्यात घातक ठरू शकतो, असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.