Dhananjay Munde And Ramdas Athawale Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde And Ramdas Athawale : मंत्री मुंडेंचा राजीनामा अजित पवार कधी घेणार? मंत्री आठवलेंनी वेळ सांगितली

Union Minister Ramdas Athawale Shirdi DCM Ajit Pawar Beed Minister Dhananjay Munde : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना भेटायला पाहिजे नव्हते, असे सांगून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार, याची वेळ देखील सांगितली. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

बीडमधील (BEED) संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झालेली आहे. यावरून मंत्री मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असतानाच, त्यांच्यावर कृषिमंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाले आहेत. यातून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले, "मंत्री धनंजय मुंडेंचे जरी वाल्मिक कराडशी संबंध असले, तरी प्रकरणाशी थेट संबंध नाही. अजित पवार यांनी आरोप सिद्ध होऊ द्या, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे तशी वेळ आल्यावर अजित पवारच (Ajit Pawar) मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याबाबत नक्की निर्णय घेतील".

संतोष देशमुख यांच्या हत्येतील वाँटेड कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याचा शोध लवकर लागला पाहिजे. पोलिसांनी एवढा वेळ कशाला घेतला पाहिजे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यावर मंत्री आठवले यांनी सोमनाथ यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला, अशी अफवा पसरवली जात आहे. यामध्ये जे पोलिस असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT