sarkarnama
sarkarnama
मराठवाडा

UPSC : बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा ; तिघांना यश

सरकारनामा ब्युरो

बीड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC ) परीक्षेत दुष्काळी व ऊसतोड मजूरांच्या जिल्ह्यातील तिघांनी यश मिळविले. यशवंत मुंडे (Dr. Yashwant Munde) (परळी), डॉ. किशोरकुमार देवरवाडे (Kishore Kumar Devarwade) (देवळा, ता. अंबाजोगाई) व शुभम नागरगोजे (Shubham Nagargoje) (वारणी, ता. शिरुर कासार) अशी यश मिळविलेल्या तिघांची नावे आहेत.

परळी वैजनाथ येथील यशवंत अभिमन्यू मुंडे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत ५०२ वी रँक मिळविली. यशवंत मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण येथील जगमित्र नागा विद्यालय व माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल (परळी) तर उच्च माध्यमिक शिक्षण लातूरच्या शाहू महाविद्यालयात झाले. मागील दोन वर्षापासून पुण्यामध्ये त्यांनी स्वयंअध्ययन केले. पीएससी परीक्षेची पूर्वतयारी पुणे येथे करून मुख्य परीक्षा मुंबई येथे तर मुलाखत दिल्ली येथे झाली. येथील जगमित्र नागा विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक ए. पी. मुंडे यांचे ते चिरंजीव आहेत.

वारणी (ता. शिरुर कासार) येथील शुभम नागरगोजे याचे वडिल जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता असून त्यांनी औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियंता ही पदवी मिळविलेली आहे. त्यांनी युपीएसी परीक्षेत ४५३ वा क्रमांक पटकाविला आहे. बॅडमिंटन व तायक्वांदो खेळांचे मैदान गाजविलेल्या शुभम नागरगोजे यांनी मेळघाटात आदीवासींसाठीही काम केले आहे.

राज्य परिवहन महामंडळात असलेल्या अशेाक देवरवाडे यांचा मुलगा डॉ. किशोरकुमार देवरवाडे यांनीही युपीएससी परीक्षेत ७५३ वी रँक मिळवून यश मिळविले आहे. डॉ. किशोरकुमार यांनी संघर्षातून मोठ्या जिद्दीने वैद्यकीय क्षेत्रात (एमबीबीएस) पदवी मिळवून आरोग्य सेवा केली. नंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी युपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्ली गाठून हे यश मिळविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT