Sudhir Mungantiwar News 
मराठवाडा

Sudhir Mungantiwar News: शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारी `वाघनखे` भारतात आणणार..

Aurangabad News : ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटून ही वाघनखे त्यांनीच नरेंद्र मोदी यांच्याकडे द्यावीत, अशी विनंती करणार.

प्रकाश बनकर

Chhatrapati Shivaji Maharaj News: छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांच्या शौर्याच्या गाथा आजही मनामनामध्ये स्फुल्लिंग चेतवतात. अफझलखानाचा महाराजांनी केलेला वध आणि त्यासाठी वापरलेली `वाघनखे`, हा इतिहासकारांच्या अभ्यासात नेहमीच महत्वाचा मुद्दा राहिला आहे. आता हीच `वाघनखे`, ब्रिटनमधून भारतात आणण्यात येणार आहेत.

व्हिक्टोरिया अॅन्ड अलबर्ट म्युझिअम, लंडन येथील संग्रहालयात ही वाघनखे आहेत. राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी छत्रपती संभाजीनगरात ही महत्वाची माहिती दिली.

येत्या १ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लंडन येथे जाऊन ही `वाघनखे`, मोठ्या सन्मानाने भारतात आणली जाणार आहेत. (Maharashtra) या संदर्भात ब्रिटन सरकारशी तसा सामंजस्य करार झाला आहे. (Aurangabad) ही वाघनखे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रालयात ठेवण्यात येणार आहेत.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ३५० समारोह साजरा होत आहे. याअंतर्गत ब्रिटन सरकारकडे असलेली वाघनखे परत आणणार आहोत. ब्रिटन सरकारने याला मंजूरी दिली आहे. आम्ही ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटून ही वाघनखे त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे द्यावीत, अशी विनंती करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

ही वाघनखे भारतात आल्यानंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रत्येक शिवभक्ताला पाहता येतील. ही वाघनखे पाहिल्यानंतर त्याचे तेज शिवभक्ताच्या डोळ्यातून ह्दयात जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT