Ranjeet Kasle On Walmik Karad News Sarkarnama
मराठवाडा

Ranjeet Kasle Claim News : मी दारू पिऊनही खर बोलतो अन् न पिता देखील! वाल्मीक कराडच्या एन्काॅऊंटर आॅफरची पोलीस डायरीत नोंद

Suspended police inspector Ranjit Kasle claims that the offer for Valmik Karad’s encounter was officially recorded in the police diary : रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले.

Jagdish Pansare

Beed Crime News : बीडचे निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांच्या सोशल मिडियावरील व्हिडिओने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत कासले यांनी आपल्याला वाल्मीक कराडच्या एन्काॅऊटरची आॅफर देण्यात आली होती, असा दावा केला. एका वृत्तावाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत आपण दारु पिऊनही खर बोलतो अन् न पिता देखील खरंच बोलतो असे सांगत एन्काऊंटरची आॅफर आल्यानंतर त्याची माहिती आपण पोलीस स्टेशनच्या डायरीत केल्याचा दावा रणजीत कासले यांनी केला आहे.

बीडचे अतिरिक्त पोलीस (Police) अधीक्षक सचिन पांडकर यांना सुद्धा या आॅफरची माहिती आपण दिली होती. त्यांनी आपल्याला योग्य सल्ला घ्या, तुमची लाईफ बदलून जाईल, तुम्हाला पूर्ण नोकरी झाल्यावर जेवढा पगाराचा पैसा मिळेल त्यापेक्षा कितीतरी पट कोटीमध्ये, तुम्ही सांगाल ती रक्कम दिली जाते, असे सांगितले होते.

निलंबित झाल्यावरच हे का सांगताय? यावर मला माझ्या नोकरीची, कुटुंबाची काळजी होती, म्हणून मी गप्प होतो. आता मला निलंबित केले आहे, तसाही मी रस्त्यावरच आलोय, म्हणून आता बोलतोयं, असंही रणजीत कासले यांनी सांगितले. पंचवीस किंवा पन्नास करोड तुम्ही मागाल तेवढी रक्कम तुम्हाला दिली जाते, असे मला वाल्मीक कराडच्या (Walmik Karad) एन्काऊंटरची आॅफर देताना मला सांगितले गेले.

50 करोड किंवा 25 करोड जेवढी रक्कम मागणी कराल तेवढी मान्य करून एन्काऊंटर साठी ती रक्कम दिली जाते अशी ऑफर मला दिली गेली होती. त्या ऑफरची माहिती मी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती. अतिरिक्त एस .पी. सचिन पांडकर यांना सुद्धा या संदर्भात माहिती दिली होती, याचा पुनरुच्चार कासले यांनी केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा बोगस बाई असा उल्लेख करत त्यांना फक्त प्रसिद्धीची हाव असल्याचा आरोप रणजीत कासले यांनी केला.

वाल्मीक कराडला सोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता, त्यानंतर आपण त्यांना फोन करून वाल्मीक कराड प्रत्यक्ष गुन्हा घडतांना तिथे नसला तरी त्याला फाशी कशी होऊ शकते? हे सांगितले होते, असा दावाही कासले यांनी आपल्या प्रतिक्रियेत केला आहे. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT