Parbhani Political News : गेल्या लोकसभा निवडणुकीत अतिशय निर्णायक मते घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतांना दिसूत असून त्यांच्या आघाडीतील समावेशाचे संकेत मिळत आहेत. (Vanchit Bahujan Aghadi News) मात्र आघाडीत स्थान न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. विशेषतः यावेळी वंचित बहुजन आघाडी ओबीसी प्रवर्गातून उमेदवार देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला बसला. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेतृत्व अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडे आहे व राज्यातील दलित समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दलित समाजाची एकगठ्ठा मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळतात.
गेल्या निवडणुकीत ओवेसी यांचा एमआयएम पक्ष वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याने त्याचाही मोठा फायदा वंचितच्या उमेदवाराला झाला होता. (Mahavikas Aghadi) एकूणच कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षाची पारंपारिक मतपेटी असलेल्या दलित व मुस्लीम समाजाची मते वंचित बहूजन आघडीला मिळाली होती. परिणामी शिवसेना व भाजप युतीला त्याचा लाभ झाला. 2019 च्या तुलनेत राज्यातील राजकीय स्थितीत आमुलाग्र बदल झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (उबाठा) गटासोबत युती केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र अद्यापही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी नसल्याने लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत स्पष्टता नव्हती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत नेतेमंडळी अनुकूल असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिले आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या संविधान बचाव कार्यक्रमाचे निमंत्रण कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनाही दिले आहे.
हे निमंत्रण स्वीकारत हिरवा कंदील दर्शवल्यानंतर वंचित बहुजन आघाडी अधिकृतपणे महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडी ओबीसी मतांवर लक्ष केंद्रित करणार असून त्या दृष्टीने व्यूहरचना केली जात आहे. तसेच उमेदवार निवडताना सुध्दा ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराचा प्राधान्याने विचार केला जाऊ शकतो. 2019 मध्ये मिळालेल्या मतांचा विचार करता जागावाटप करताना वंचित बहुजन आघाडीचा सहभाग महत्वाचा ठरू शकतो. अन्यथा 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती यावेळी सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.