VasantChavan, Prakash Ambedkar Sarkarnama
मराठवाडा

Vanchit VS Congress : वंचितने वाढवले काँग्रेसचे टेन्शन; नांदेडमधील स्थिती काय?

Nanded Congress : गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमुळे राज्यातील ज्या जागेवर काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यात नांदेडचा समावेश होता.

Laxmikant Mule

Nanded Political News : नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट झाल्यानंतर पक्षाने सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक वर्षे राजकारण केलेल्या माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी देत या निवडणुकीत रंगत आणली. मात्र, महाविकास आघाडीचा घटक पक्ष होऊ पाहत असलेल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही. परिणामी काँग्रेसच्या चव्हाण यांचे टेन्शन वाढवले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशाने आधीच भगदाड पडलेली काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या तळ्यात-मळ्यात भूमिकेने कोंडीत सापडली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्ष फुटल्यामुळे काँग्रेसला कमबॅक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची साथ मोलाची ठरणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितकडे निर्णायक मते असल्यामुळे काँग्रेस केवळ नांदेडच नाही तर मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांमध्ये गेम चेंजर ठरू शकतात. त्यामुळे वंचितच्या भूमिकेकडे काँग्रेसचे लक्ष लागले आहे.

राज्यातील महायुती‌ महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ आद्यप सुटलेला नाही. मात्र, ज्या जागांवर महायुतीत व आघाडीत वाद नाही. अशात भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार घोषित केले आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष होतो की नाही, हे स्पष्ट झाले नाही. तर वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर‌ (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.

नांदेडच्या (Nanded) जागेवर वंचित बहुजन आघाडी उमेदवार‌ देणार की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. आघाडीचे नेते आशावादी असले तरी दुसरीकडे प्रकाश आंबेडकर‌ यांनी शिवसेनेसोबत असलेली युती संपुष्टात आल्याचे जाहीर करत महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. तसेच आपली भूमिका येत्या एक-दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे सांगितले आहे. तसेच जो काही निर्णय घेण्यात येईल त्या निर्णयासोबत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी राहावे, असे आवाहनही केले.

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit) नांदेडमध्ये तब्बल एक लाख साठ हजारांच्या वर मते घेतली होती. वंचितच्या उमेदवारांमुळे राज्यातील ज्या जागेवर काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यात नांदेडचा समावेश होता. गेल्या निवडणुकीत काँग्रेसची पारंपरिक मते वंचितला मिळाली होती. त्यामुळे वंचित काँग्रेसबरोबर राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात सध्या तरी यश आले नाही. दुसरीकडे अशोक चव्हाण नांदेड काँग्रेसमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा नाजूक परिस्थितीत धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणे हे काॅंग्रेसला परवडणारे नाही, तर या मतांची विभागणी होणे हे भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे.

काँग्रेसने नांदेडला माजी आमदार वसंतराव चव्हाण (Vasant Chavan) यांना उमेदवारी दिली आहे, तर भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी घोषित केली आहे. या दोन्ही उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे, पण या दोन्ही उमेदवारांचे लक्ष वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयाकडे लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT