Varun Sardesai, Yuvasena
Varun Sardesai, Yuvasena Sarkarnama
मराठवाडा

Varun Sardesai : युवासेनेत मोठी पडझड नाही, नवी कार्यकारणी दोन दिवसांत..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात निर्माण झालेल्या विद्यमान परिस्थितीत युवासेनेत मोठी पडझड झालेली नाही. काही मोजकेच जण गेले असले तरी जाणाऱ्यापेक्षा (Yuvasena) युवासेनेत आलेले महत्वाचे आहेत. औरंगाबाद जिल्ह्याची युवासेनेची नविन कार्यकारीणी येत्या दोन दिवसात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे जाहीर करतील, अशी माहिती युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून सरदेसाई (Aurangabad) औरंगाबाद जिल्‍ह्याच्या संघटनात्मक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सरदेसाई म्हणाले, गेल्या ११ दिवसांपासून मराठवाड्यात युवासेनेचे निर्धार अभियान सुरू आहे. या अभियानात विधासभानिहाय निष्ठावंत युवासैनिकांशी संवाद साधला.

४३ विधानसभा मतदार संघात आतापर्यंत युवासैनिकांचे मेळावे घेतले असून ४८ मतदार संघात मेळावे घेणार आहोत. या मेळाव्‍यांमधून युवासैनिक, शिवसैनिकांसह सर्वसामान्य जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात झालेली गद्दारी महाराष्टाला पसंत पडली नसून लोक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत ठामपणे असल्याचे या दौऱ्यात निदर्शनास आले.

ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी खूप चांगले आकडे घेवून शिवसेना विजयी झालेली दिसेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. युवकांमध्ये बेरोजगारीवरून प्रचंड रोष आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या समोर नांदेडमध्ये नोकरभरतीवरून युवकांनी आंदोलन केले, यावेळी सौम्य लाठीमारही झाला. तर दुसरीकडे लाखो युवकांना रोजगार देणारे प्रकल्प महाराष्टातुन जात असल्याची टिका त्यांनी केली.

युवासेनेत संघटन मजबुत आहे, काहीजण गेले मात्र त्यांच्यापेक्षा जास्त आलेले आहेत. जे पदाधिकारी गेले त्यांची जागा घेण्यासाठी इच्छूकदेखील भरपूर आहेत. युवासेनेचे उपसचिव ऋषिकेश खैरे यांनी जिल्ह्यातील यादी पाठवली आहे, दोन दिवसात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याची युवासेनेची नविन कार्यकारीणी जाहीर करतील असेही सरदेसाई यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT