Latur Z.P.
Latur Z.P. Sarkarnama
मराठवाडा

Latur : जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापतींच्या गाड्या प्रशासनाकडे जमा

सरकारनामा ब्युरो

लातूर : मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा पंचवार्षीक कार्यकाळ २१ मार्च रोजी संपला आहे. (Latur) त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतींच्या दिमतीला सणाऱ्या गाडया जिल्हा परिषदेकडे (zilla parishad) जमा झाल्या आहेत.

लातूर जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊन २१ मार्च २०१७ रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मिलींद लातुरे यांनी तर उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र तिरुके यांनी पदभार स्वीकारला होता.(Marathwada)

अडीच वर्षांनंतर ६ जानेवारी २०२० रोजी अध्यक्ष म्हणून राहूल केंद्रे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांचा व सर्व सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ नुकताच संपला. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांच्या दिमतीला जिल्हा परिषदेने सहा गाड्या दिल्या होत्या.

या गाड्यातूनच या मान्यवरांनी जिल्ह्यात विविध विकास कामांची पाहणी, दौरे, कार्यक्रम पार पाडले. या गाड्यांच्या सोबतच या पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला प्रतिनियुक्तीवर विविध विभागातून ९ स्वीयसहाय्यक, १२ सेवक, ६ ड्राव्हर देण्यात आले होते.

कार्यकाळ संपताच हा सर्व लवाजमा आपआपल्या आस्थापनाच्या जागी रूजू होत आहे. सर्व गाड्यावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींच्या नावाच्या पाट्या देखील काढण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT