Vijay Wadettiwar Sarkarnama
मराठवाडा

Video Laxman Hake : वडेट्टीवार गहिवरले अन् थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला; हाकेंनी मात्र चर्चेला नकार दिला..

Vijay Wadettiwar & OBC Reservation : हाके यांनी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मी समाधानी नाही, ते ठोस काही बोलत नाहीत, गुळगुळीत उत्तर देतात, असे म्हणत शिष्टमंडळाशी चर्चाच करणार नसल्याचे म्हटले आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Political News : वडीगोद्री येथे मराठा आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन हाके यांच्या प्रकृतीची चौकशी केली. हाके यांची खालावलेली प्रकृती पाहून वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले. त्यांनी लगोलग मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि ओबीसींच्या मागण्यावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली.

हाके यांच्या भेटीसाठी उद्या, शुक्रवारी शिष्टमंडळ पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. पण हाके Laxman Hake यांनी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मी समाधानी नाही, ते ठोस काही बोलत नाहीत, गुळगुळीत उत्तर देतात, असे म्हणत शिष्टमंडळाशी चर्चाच करणार नसल्याचे म्हटले आहे. उद्या शिष्टमंडळ पाठवणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी लावलेल्या फोनवर बोलतांना सांगितले.

यावर हाके म्हणाले, दोनच प्रश्न आम्ही विचारले आहेत, त्यासाठी शिष्टमंडळ कशासाठी पाठवतात. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर मी समाधानी नाही ते ठोस काही बोलत नाही. गुळगुळीत उत्तर देतात, शिष्टमंडळ कशासाठी मी त्यांच्याशी बोलणार सुद्धा नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडायची अन् निघून जायचं, अशी स्पष्ट भूमिका हाके यांनी घेतली आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. 21) रोजी वडीगोद्री येथे हाके यांच्यांशी चर्चा करायला येणाऱ्या शिष्टमंडळाला तोडगा काढण्यात यश येते, की ते रिकाम्या हाताने परततात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

कुणबी जातीच्या प्रमाणपत्राआधारे सगेसोयरे यांच्यासह मराठा समाजाला Maratha Reservation ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 8 जून रोजी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. 13 जून रोजी मंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला जरांगे पाटील यांनी 13 जुलैपर्यंतची मुदतवाढ देत उपोषण स्थगित केले. राज्य सरकार सगेसोयरे संदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून प्रा. लक्ष्मण हाके यांनी अंतरवाली शेजारी असलेल्या वडीगोद्रीत उपोषण सुरू केले आहे.

सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे हाके यांची प्रकृती बिघडत चालली आहे. ओबीसी नेत्यांनी सरकारने या उपोषणाची दखल घ्यावी, असे आवाहन केले. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार Vijay wadettiwar या नेत्यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीही हाके यांच्याशी फोनवर चर्चा करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

सरकारच्या वतीने मात्र अद्याप या आंदोलनाकडे कुणी फिरकले नाही. आज उपोषणाचा आठवा दिवस असताना काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी हाकेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना त्यांनी जागेवरूनच फोन लावल्यानंतर उद्या शिष्टमंडळ पाठवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र यावर हाके यांनी या शिष्टमंडळाशी चर्चाच करणार नाही, अशी कडक भूमिका घेतल्याने उद्या नेमकं काय घडणार? यावर सगळं काही अवलंबून असणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT