Gangakhed Election Campaign 
मराठवाडा

Gangakhed Assembly Election : विशाल कदम यांची दिवसभरात तीन तालुक्यात भ्रमंती

Vishal Kadam Election Campaign : प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत वाढला विशाल कदम यांच्या प्रचाराचा जोर

सरकारनामा ब्युरो

पूर्णा : गंगाखेड विधासनभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचाराचा वेग वाढला आहे. प्रचारासाठी शेवटचे दिवस उरल्याने एकाच दिवसात तीन तालुक्यात कदम यांच्याकडून प्रचार केला जातोय.

आलेगाव, कावलगाव, चुडावा परिसरातील विविध गावात विशाल कदम यांनी भेटी दिल्या. या प्रचार दौऱ्यात बाजार समितीचे माजी सभापती बालाजी देसाई, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शाहजीराव देसाई, नारायण पिसाळ, साखर कारखान्याचे संचालक श्रीधर पारवे, गजानन धवन, तुकाराम चव्हाण, विश्वनाथआप्पा सोळंके, दशरथ भोसले, माजी सभापती अशोक बोकारे, कोंडिबा सोनटक्के, बंडूआप्पा बनसोडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बालाजी देसाई म्हणाले, गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी या मातीचे उपकार मानत ते फेडण्यासाठी धडपड करणार्‍या भूमिपुत्र असलेल्या कदम विशाल विजयकुमार यांना मतदान करुन विजयी करा.

शहाजी देसाई यांनी मराठवाड्यात सर्वात अविकसित असा हा मतदारसंघ आहे, हा कलंक पुसण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठिशी ताकतीने उभे रहा, असे आवाहन केले. व्यापारी महासंघाच्या व्यापक बैठकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीला पाठिंबा व्यक्त करत सर्वशक्तीनिशी कदम यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मतदारसंघात औद्योगिक विकास घडवून आणत बेरोजगारी कमी करण्यासाठी व आर्थिक विकास करण्यासाठी मशाल ला मतदान करा. ग्रामीण रस्ते, वीज, सिंचन, पाणी व शिक्षण यासाठी तळमळीने काम करण्याची क्षमता असणाऱ्या विशाल कदम यांनाच मतदान करा, असे आवाहन जेष्ठ समाजसेवक डॉ. दत्तात्रेय वाघमारे व डॉ. द्वारकादास झंवर यांनी केले.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश मोदानी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. दत्तात्रेय वाघमारे डॉ. द्वारकादास झंवर, जब्बार थारा, डॉ. विनय वाघमारे, डॉ गुलाबराव इंगोले, प्राचार्य डॉ. केशव जोंधळे, अमृतराज कदम, प्रविण शिंदे, अली हसन, ओंकार कदम, आदींनी विचार व्यक्त केले. पालम येथे विशाल कदम यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाब सिरसकर, गजानन साहेबराव सिरसकर, लहूजी रोकडे, काँग्रेसचे कल्याण सिरसकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख श्रीकांतराव कराळे, शहर प्रमुख किशोर घोरपडे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT