Marathwada News : मराठवाड्यातील मतदारयादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम हाती घेतली. याअंतर्गत ३० जून ते १८ ऑगस्ट या कालावधीत मराठवाड्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओंनी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण व संकलन करत ते डिजिटल केले.
त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने सोमवारी मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील एकूण २१ लाख ४२ हजार ४२ मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालय प्रशासनाकडून देण्यात आली.
वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये पत्त्यावर न सापडणे, स्थलांतरित, मृत व डुप्लिकेट अर्थात 'एएसडीडी' म्हणजेच ॲबसेंट, शिफ्टेड, डुप्लिकेट, डेड या वर्गवारीत समावेश करण्यात आले आहेत. विविध कारणांमुळे वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी जिल्ह्यात निवासासाठी असलेल्या परंतु 'एसआयआर’अंतर्गत मॅपिंग नोंद न झालेल्या मतदारांना पुन्हा नावनोंदणीची संधी दिली जाणार आहे.
३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत विभागातील मतदार संख्या १ कोटी ३६ लाख ५७ हजार ३६७ झाली आहे. पूर्वीच्या मतदार यादीतील १ कोटी ५७ लाख ९८ हजार ४९६ मतदारांच्या तुलनेत तब्बल २१ लाख ४१ हजार १२९ मतदारांची घट झाली आहे. ही घट पूर्वीच्या मतदार संख्येच्या १३.५५ टक्के असल्याचेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
दावे, हरकती नोंदविण्यासाठी संबंधित मतदारांना फॉर्म नंबर ६ भरून तो बीएलओ किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदान अधिकाऱ्यांकडे जमा करता येणार आहे. वगळलेल्या मतदारांसह इतर आक्षेप, दावे, हरकती असलेल्यांना १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान वरील अधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार आहे.
यामध्ये मतदारयादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी फॉर्म नंबर ६, मतदारयादीतील नावाच्या समावेशास हरकत घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी फॉर्म नंबर ७, तर मतदारयादीतील नोंदींच्या तपशीलात दुरुस्ती, बदल किंवा अद्ययावत करण्यासाठी फॉर्म नंबर ८ मध्ये अर्ज करता येईल.
कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार - ९,०७,४८५
पत्त्यावर न आढळलेले मतदार - ५,२२, ८७३
मृत मतदार - ४,३५,४५५
दुबार मतदार - २,७०,१७६
इतर (बीएलओंना माहिती न देणारे) - ६,०५३
मराठवाड्यातील वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक म्हणजेच तब्बल ९ लाख ७ हजार ४८५ इतके मतदार (४२.३७ टक्के) स्थलांतरित झाले आहेत. याशिवाय मराठवाड्यातील एकूण मतदारांपैकी ६८ लाख ६३ हजार ९०६ पुरुष मतदार, तर ६७ लाख ९३ हजार १८७ महिला मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत ७० हजार ७१९ ने महिला मतदारांची संख्या कमी आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एसआयआर मोहिमेपुर्वीची मतदार संख्या १,५७,९८,४९६ एवढी होती. मोहिमेनंतर नवीन प्रारूप यादीनूसार ती आता १,३६,५७,३६७ इतकी झाली आहे. त्यानूसार मराठवाड्यातून एकूण २१,४२,०४२ मतदार वगळण्यात आले आहेत.
नांदेड - २७,७७,०७३ - २३,८८,७२१ - ३,८८,३८७
हिंगोली - ९,६९,३८५ - ८,८४,०७६ - ८५,३१६
परभणी - १५,४१,००७ - १३,६०,७७६ - १,८०,२४९
जालना - १६,८२,७२३ - १४,३९,५४० - २,४३,१८७
छत्रपती संभाजीनगर - ३२,१६,१६७ - २६,०८,५०७ - ६,०८,४००
बीड - २१,९३,८२७ - १९,५३,४२० - २,४०,४७७
लातूर - २०,०४,४५० - १७,९०,००८ - २,१४,४८१
धाराशिव - १४,१३,८६४ - १२,३२,३१९ - १,८१,५४५
एकूण - १,५७,९८,४९६ - १,३६,५७,३६७ - २१,४२,०४२
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.