Walmik Karad Sarkarnama
मराठवाडा

Rohit Pawar : वाल्मिक कराड असलेल्या पोलिस ठा‎ण्यात 5 नवे पलंग‎ मागवले, प्रशासनाने स्पष्टीकरण देताच रोहित पवारांनी साधलं अचूक टायमिंग

Rohit Pawar On Beed Police : न्यायलयाने वाल्मिक कराड याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. तो सध्या केजमधील सीआयडीच्या कोठडीत आहे. तर वाल्मिक कराड ज्या कोठडीत त्या ठिकाणी पोलिस ठाण्याबाबतराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.

Jagdish Patil

Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून बीड पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे. शिवाय पोलिसांनी वेळीच योग्य पाऊल उचलली नसल्यामुळेच बीडचा बिहार झाल्याचा आरोपही केला जात आहे.

अशातच संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराड नुकताच पोलिसांना शरण गेला आहे. तर न्यायलयाने कराड याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. तो सध्या केजमधील सीआयडीच्या कोठडीत आहे. तर वाल्मिक कराड ज्या कोठडीत त्या ठिकाणी पोलिस ठाण्याबाबतराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा दावा केला आहे.

रोहित पवारांनी केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, "बीड पोलिस (Beed Police) ठाण्यामध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.

नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा." रोहित पवारांनी या पोस्टमध्ये कोणाचंही नाव लिहिलं नसलं तरी त्यांनी एकंदरीत हा पलंग आरोपीसाठी आणला नाही ना? असा संशय त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

एकीकडे वाल्मिक कराडने आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सीआयडीला शरण येण्याआधी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. मात्र, दुसरीकडे आता त्याच्यावर ज्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा आणि देशमुख यांच्या हत्येचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिस आणि सीआयडी वाल्मिक कराडवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT