The Supreme Court of India building in New Delhi, where Walmik Karad’s bail plea in the Santosh Deshmukh murder case was rejected. sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad Bail Rejected : वाल्मिक कराडला सुप्रिम कोर्टाचा मोठा दणका! तुरुंगातून बाहेर येण्याच्या वाटा बंद

Supreme Court on Walmik Karad Bail : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना केज तालुक्यातील तांबवा या ठिकाणाहून अटक झाली. 12 डिसेंबरला घुले या तिसऱ्या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली. 18 डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून तर 4 जानेवारी रोजी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती.

Jagdish Pansare

Marathwada News, 26 Feb : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने सगळा महाराष्ट्र हादरला होता. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने आपला या प्रकरणाशी संबंध नाही, मला दोषमुक्त करा, माझी जामीनावर सुटका करा यासाठी जंगजंग पछाडले.

बीडच्या विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर वाल्मिकने औरंगाबाद खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालया आणि थेट सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली. परंतु या सगळ्या ठिकाणी वाल्मिक कराडच्या पदरी निराशाच आली. गुरूवारी (ता.२६) वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि त्यात देखील त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे वाल्मिक कराडला मोठा दणका बसला असून आता त्याच्या तुरुंगातून बाहेर येण्याच्या वाटा बंद झाल्या आहेत.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीनाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज जरी जामीन नाकारला असला तरी वाल्मिक कराडला पुन्हा जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. पण त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण जर ट्रायल पुढे जात नसेल तर वर्षभरात पुन्हा वाल्मिक कराड सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतो. या प्रकरणाची पहिली सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे.

याआधी सुप्रीम कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि बीड जिल्हा न्यायालयात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज आणि दोष मुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला होता. सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांनी याबाबत कॅव्हेट दाखल केले होते. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना केज तालुक्यातील तांबवा या ठिकाणाहून अटक झाली. 12 डिसेंबरला घुले या तिसऱ्या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली. 18 डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून तर 4 जानेवारी रोजी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती. तर सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक झाली होती. तर या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी अद्याप फरार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT