Minister Abdul Sattar-Uddhav Thackeray news, Marathwada
Minister Abdul Sattar-Uddhav Thackeray news, Marathwada Sarkarnma
मराठवाडा

Parbhani : घरात बसून युद्ध जिंकता येत नाही, कृषीमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला..

सरकारनामा ब्युरो

पूर्णा : शेतकऱ्यांना सक्षम करण्याचेच धोरण अन तोच संकल्प आमचा असून त्याच दिशेने आम्ही धोरण आखत आहोत. (Parbhani) त्याचे प्रतिबिंब आगामी अर्थसंकल्पात दिसेल, असा विश्वास कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला. गोंधळसम्राट राजारामबापू कदम सांस्कृतिक सभागृहात हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियाना निमित्त शिंदे गटाचा मेळावा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाहीत. (Marathwada) आता मात्र आडीच वर्षात तुंबलेली कामे तडीस नेण्याचा आम्ही सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही रात्रंदिवस राज्यातील जनतेच्या हिताची कामे करण्यात स्वतःला झोकून दिले आहे.

घरात बसणारा सरदार युद्ध जिंकू शकत नाही. कोणतीही लढाई घरात बसून जिंकता येत नसते, असा टोला सत्तार यांनी नाव न उद्धव ठाकरे यांना लगावला. शिवाजी महाराजांसारखे हातात शस्त्र घेवून मैदानावर उतरून सामना करावा लागतो. आता तसे नेतृत्व राज्याला लाभले आहे. राज्य करताना आमच्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असून सर्व जाती धर्मीयांना सोबत घेवून त्यांच्या कल्याणाचा व राज्याला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असेल.

सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला असल्याचेही सत्तार म्हणाले. या मेळाव्यात अनेक गावातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर अनेक नागरिक व शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना मागण्यांची निवेदने दिली. यात प्रामुख्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT