Abul Sattar| chandrakant khaire| 
मराठवाडा

तोंड सांभाळा नाहीतर..! चंद्रकांत खैरेंचे सत्तांरांना उत्तर

Abul Sattar| chandrakant khaire| सत्तारांना या पक्षातून त्या पक्षात फिरण्याची त्यांची सवय आहे. आता ते कोणत्या पक्षात जातील हे सांगता येत नाही.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News | औरंगाबाद : ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हाताखाली काम केलं आज तेच त्यांच्यावर टीका करत आहेत. चार पक्ष फिरून आलेल्यांचा आम्ही बंदोबस्त आम्ही करू. आदित्य ठाकरे फिरलेत, आमदार, खासदार फिरले, मविआ नेते, विरोधी पक्षनेते राज्यभर फिरत आहेत. आता कितीही काही झालं तरी आता बस्स झालं. तोंड सांभाळा नाहीतर आम्ही कायदा दाखवून देऊ, असा इशारा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिला आहे.

उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करत आहे. पण उद्धव ठाकरे 24 मिनिटांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी कशी पाहणी करणार, अशी टोला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला होता. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी किती ठिकाणी पाहणी केली याचे उत्तर अब्दुल सत्तारांनी आधी द्यावे, असा टोला खैरे यांनी लगावला आहे.

निवडणुकीत निवडून आणण्यासाठी सत्तार माझे आणि उद्धव ठाकरेंच्या पाया पडायचे. मला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणा म्हणत आमचे पाय धरायचे. आता सत्तार यांना मस्ती आली आहे. या पक्षातून त्या पक्षात फिरण्याची त्यांची सवय आहे. आता ते कोणत्या पक्षात जातील हे सांगता येत नाही. त्यामुळे आता त्यांचा आम्ही बंदोबस्त करणार, असेही खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT