MLA Disqualification News : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला सुनावणी घेणार आहेत. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेचे ५४ आमदार या सुनावणीसाठी एकाच छताखाली येणार आहेत, यावर भाष्य करताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले की, आमच्यावर नियमानुसार अपात्रतेची कारवाई होऊच शकत नाही.
सत्तार छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. अब्दुल सत्तार म्हणाले, आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगानेसुद्धा सांगितले आहे. सुनावणी होईल योग्य न्याय मिळेल. धनुष्यबाण आमच्याकडे आहे, त्यामुळे मूळ शिवसैनिक आम्ही आहोत. आमच्यावर नियमानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, असे माझे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. याबाबत सरकार नेहमीच प्रयत्न करत असते. त्यात आता मराठवाड्यात 16 तारखेच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल. शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक मदत देण्यासह आणखी काही उपाययोजना करता येतील का याचा विचार करण्यात येईल, असे सत्तार यांनी सांगितले.
मला मराठा समाजबाबत आस्था आहे. मात्र, ओबीसी (OBC) समाजाला धक्का न लागू देता आरक्षण द्यायचे आहे. दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी... राज्य सरकारने आता माजी न्यामूर्तीची समिती तयार केली आहे. धोरणात्मक निर्णय होईल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे चिंतित आहेत. अनेक अडचणी आहेत. 16 तारखेच्या अगोदर काहीतरी पर्याय निघेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, नाहीतर नवा वाद सुरू होईल...समन्वयाने भूमिका घ्यावी लागेल, अशी भूमिका सत्तार यांनी मांडली.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.