Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News
Chandrakant Khaire-Dr. Bhagwat Karad News Sarkarnama
मराठवाडा

Dr.Bhagwat Karad On Khaire News : खैरेंचे आरोप म्हणजे विझण्यापुर्वीच्या दिव्याची अखेरची फडफड..

सरकारनामा ब्युरो

Bjp : लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी माध्यमांशी बोलतांना केला होता. याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खैरेंचे आरोप म्हणजे एखादा दिवा विझण्यापुर्वी जशी अखेरची फडफड करतो तसे आहेत. बिनबुडाचे आणि तर्कहीन असे हे आरोप आहेत.

भाजप (Bjp) कधीही जातीय तेढ निर्माण करत नाही, सर्वांनासोबत घेवून चालण्याचेच आमचे कायम धोरण राहिले आहे. खैरे हे राजकारणातून बाहेर फेकले गेलेले नेते आहेत, एखादा पक्षी बळ नसतांना उडण्याचा प्रयत्न करतो तसेच काहीसे खैरे यांच्या बाबतीत होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळे तरी (Chandrakant Khaire) खैरेंना थोडीफार किमंत आली आहे, पण आपल्याच पक्षातील ज्युनिअर माणूस राजकारणात पुढ निघून गेला या नैराश्यातून खैरे असे आरोप करत असतात, असा टोला देखील कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी लगावला.

अकोला आणि शेवगावमध्ये झालेल्या दंगलीचा दाखला देत चंद्रकांत खैरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली होती. कर्नाटकातील पराभवानंतर आता लोकसभा जिंकण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. खैरे यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांची ही शेवटची फडफड असल्याचे कराड यांनी म्हटले आहे.

शहरातील किराडपुरा भागातील दंगल, नामातंराच्या विरोधात एमआयएमच्या खासदाराने केलेले आंदोलन याला देखील भाजपचीच फूस होती, एमआयएम ही त्यांची बी टीम आहे, या आरोपांना देखील कराड यांनी प्रत्युत्तर दिले. भाजप आणि एमआयएम हे कधीही एक होवू शकत नाही, आमची विचारधारा आणि एमआयएमची विचारधारा कधीही एक असू शकत नाही. आम्ही जातीय द्वेषाच्या राजकारणाचे कधीही समर्थन करत नाही, करणार देखील नाही, असेही कराड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT