Student Protest in Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

आमचा अभ्यास झालेला नाही, दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला..

परीक्षा द्यायची म्हटलं तर लिखाणाचा देखील तितकासा सराव राहिला नाही. त्यामुळे किमान महिनाभर तरी परीक्षा पुढे ढकलाव्यात, जेणेकरून लिखाणाचा सराव आणि अभ्यासाला वेळ मिळेल. (Aurangabad)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती, आॅनलाईन क्लासमध्ये अडथळे येत होते. (Aurangabad) त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा (Exam) देण्याइतपत आमची तयारी, अभ्यास झालेला नाही. (Marathwada) तेव्हा महिनाभर परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

येत्या सहा दिवसांत या मागणीवर निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देखील या विद्यार्थ्यांनी दिला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या परीक्षा आॅफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

कोरोना संसर्ग कमी होत असल्याने योग्य ती खबरदारी व कोरोना नियमांचे पालन करत या परीक्षा घेण्याची तयारी सरकारने चालवली आहे. परंतु या परीक्षांना काही विद्यार्थ्यांकडून विरोध होतांना दिसतो आहे. अभ्यास झाला नसल्याचे कारण देत विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

आज सोमवारी (ता. ३१) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी निदर्शने करत दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. कोरोना काळात महाविद्यालये, शाळा पुर्णपणे बंद होत्या. आॅनलाईन क्लासेसचा पर्याय होता, पण त्यात अनेक अडथळे होते. इंटरनेट कनेक्टीव्हिटी, संपर्क तुटणे यामुळे आॅनलाईन अभ्यास फारसा झालाच नाही.

शिवाय परीक्षा द्यायची म्हटलं तर लिखाणाचा देखील तितकासा सराव राहिला नाही. त्यामुळे किमान महिनाभर तरी परीक्षा पुढे ढकलाव्यात, जेणेकरून लिखाणाचा सराव आणि अभ्यासाला वेळ मिळेल. येत्या सहा दिवसांत या मागणीवर निर्णय घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT