Bjp March in Aurangabad for Water
Bjp March in Aurangabad for Water Sarkarnama
मराठवाडा

जल आक्रोश : सत्ता बदल तर करूच, पण भ्रष्ट व्यवस्था संपवून नागरिकांना आधी पाणी देऊ ...

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : स्व.गोपीनाथ मुंडे यांनी इथूनच मोर्चा काढला होता आणि सत्ता बदलली होती. आम्हीही सत्ता बदलूच पण त्या आधी इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला गाडून औरंगाबादकरांना (Aurangabad) पाणी देवू. पाणी दिल्याशिवाय हा संघर्ष आता थांबणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेला दिला. पाण्यासाठी हा जल आक्रोश आहे, केवळ भाजपचा हा मोर्चा नाही, तर जगन्नाथाचा रथ आहे. (Bjp) ज्याला ओढायचा त्याने सामील व्हावे अन्यथा बघत बसावे, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादच्या पैठणगेट पासून सांयकाळी साडेपाच वाजता जल आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डाॅ.भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे,नारायण कुचे हे देखील मोर्चात सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने महिला, भाजपचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले आहेत. क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर फडणवीस मोर्चात सहभागी झाले.

पैठणगेट येथे एका खुल्या वाहनात फडणवीस, दानवे, कराड, सावे उभे होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, आम्ही शहरासाठी दिलेली पाण्याची योजना हे सरकार पुर्ण करू शकलेले नाहीत. भ्रष्ट व्यवस्थेमुळे औरंगाबादकरांना पाण्यासाठी तरसावे लागत आहे. त्यामुळे हा मोर्चा एकट्या भाजपचा नाही, तर पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. या मोर्चामुळे सत्ता बदल होणार का? तर नक्कीच होणार पण त्याआधी आम्हाला येथील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यवस्था बदलून नागरिकांना पाणी द्यायचे आहे.

आमच्या मोर्चाला नौंटकी म्हणणारे घरात बसून जे करत आहेत, ती खरी नौटंकी आहे, असा टोला देखील फडणवीस यांनी खासदार इम्तियाज जलील यांना लगावला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला डोक्यावर रिकामा हंडा घेऊन सहभागी झाल्या होत्या. औरंगाबादकरांचे पाण्यावाचून वाळवंट झाले आहे, हे दाखवण्यासाठी मोर्चात उंट देखील आणण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT