Dhananjay Munde News, Beed
Dhananjay Munde News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : मुंडेच्या वेलकमची राज्यभर चर्चा, पण वेळ न पाळल्याने गुन्हा दाखल..

सरकारनामा ब्युरो

Beed News: राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) हे अपघातातून बचावल्यानंतर प्रथमच परळीत आले. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी आणि कार्यक्रमाचे आयोजन समर्थकांकडून करण्यात आले होते. यावेळी रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाची त्यात मुंडे यांनी केलेल्या भावनिक भाषणाची राज्यभरात चर्चा देखील झाली.

पण कार्यक्रमाला पोलिसांनी दिलेली रात्री दहाची वेळ न पाळल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्या विरोधात परळी पोलिसांनी गुन्हा दाखल (Fir Filed) केला आहे. (Parli) कार्यक्रमाला पोलिसांनी रात्री १० वाजेपर्यंत परवनागी दिली होती. पण मुंडे यांची मिरवणूक व भाषण रात्री बारानंतरही सुरू होते.

याप्रकरणी पोलिस अमंलदार विष्णू फड यांच्या तक्रारीवरून आयोजक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या गाडीला ४ जानेवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास परळी शहरात भीषण अपघात झाला होता.

या दुर्घटनेत मुंडे यांच्या बरगड्यांना फॅक्चर तसेच डोक्याला देखील मार लागला होता. मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हाॅस्पीटलमध्ये उपचार घेतल्यानंतर काही दिवस त्यांनी मुंबईतील निवास्थानी विश्रांती घेतली. त्यानंतर महिनाभराने ते रविवारी परळी शहरात परतले होते. अपघातातून बचावलेल्या मुंडे यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी परळी शहरात केली होती.

क्रेनने भला मोठा हार, जेसीबीतून फुलांची उधळण, डीजेचा दणदणाट आणि त्यात माझा शेवटचा श्वास देखील परळीकरांच्या सेवेसाठी समर्पित असेल, असे मुंडे यांनी केलेले भावनिक भाषण, यामुळे या वेलकम सोहळ्याची रंगत आणि चर्चा होती. मात्र नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आता आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT