Suresh Dhas-Sanjay Raut News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Raut On Suresh Dhas : सुरेश धस भाजपा परंपरेस जागले; बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाले ?

Discover the latest updates about the deal at Bavankule's home and the trust issues surrounding Suresh Dhas. Sanjay Raut criticizes the situation in his latest statement. : राऊत यांनी या संदर्भात आपल्या पेजवरून पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही.

Jagdish Pansare

Maharashtra Politics : भाजपाचे आमदार सुरेश धस गेल्या अडीच महिन्यापासून धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात पेटून उठले होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी, वाल्मीक कराड यांच्यासह धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत धस यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली. पण हेच सुरेश धस त्यांच्या पक्षाचे राज्याचे प्रमुख व सरकारमधील मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांना भेटायला गेले.

या गुप्त भेटीचे गुपितही बावनकुळे यांनीच फोडले. यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धस-बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला विश्वास उडाला आहे. भाजपच्या वापरा आणि फेका या परंपरेला ते जागले. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली? असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपाला कोंडीत पकडले आहे.

राऊत यांनी या संदर्भात आपल्या पेजवरून पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपा परंपरेस जागले. वापरा आणि फेका. वापरा आणि सौदा करा. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाले? अशा शब्दात राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त केला.

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो होतो. विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त प्रकृतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखे काय आहे? असे म्हणत धस यांनी या भेटीचे समर्थन केले होते.

भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी झाली. बावनकुळे यांच्या घरी जेवण्यासाठी दोघांना बोलावण्यात आले होते. या दोघांमध्ये चार तास चर्चा झाल्याच्ये बोलले जाते. बावनकुळे यांनी धस-मुंडे भेट आणि दोघांमध्ये चार साडेचार तास चर्चा झाल्याचे माध्यमाना सांगितले होते. तर सुरेश धस यांनी मात्र त्यांचा दावा फेटाळून लावत काही मिनिटांची भेट झाल्याचे कबुल केले होते. या भेटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर रोखठोक शब्दात टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT