Sanjay Raut News  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Raut On Upcoming Election: जे कर्नाटकमध्ये घडलं, तेचं महाराष्ट्रात घडणार..

Shivsena News: अमित शाह मुंबईत येतात, मराठवाड्यात येतात मात्र तरी सुद्धा महाराष्ट्रात भाजपचा पराभव अटळ आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : लवकरच देशातील प्रमुख पक्षांची बैठक पाटण्यामध्ये होणार आहे. सगळे देशभक्त पक्ष या बैठकीला उपस्थितीत राहणार आहेत. (Sanjay Raut On upcoming Election News) त्यामुळे पुढच्या टप्यात भाजपला एकाही राज्यात निवडणूक जिंकता येणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जे कर्नाटकमध्ये घडलं तेच महाराष्ट्रात घडणार, असेही राऊत म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटण्यात होणाऱ्या भाजप विरोधी सर्व देशभक्त पक्षांच्या बैठकीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे,(Uddhav Thackeray) शरद पवार सगळे उपस्थित असतील. पुढची राजकीय लढाई तिथून ठरेल, पुढच्या टप्प्यात एकही राज्य भाजप जिंकणार नाही. केसीआर यांना (Bjp)भाजपने महाराष्ट्रात आणले असून भाजप इतर पक्षांचा वापर करत आहे.

मनसे असो वा एमआयएम भाजप सगळ्यांचा वापर करतो. केसीआर यांना आव्हान आहे, आपली लढाई कुणाशी आहे हे ओळखा, मतांचे विभाजन होऊ देऊ नका, असे आवाहन देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. नितेश राणे यांच्या सारख्या ज्युनिअर लोकांनी शरद पवार यांच्याविषयी असे बोलणे योग्य नाही. ही भाजपची संस्कृती आहे का?

अमित शाह मुंबईत येतात, मराठवाड्यात येतात मात्र तरी सुद्धा महाराष्ट्रात भाजपचा पराभव अटळ आहे. कर्नाटकात जे झाले तेच महाराष्ट्रात होईल, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर टीका केली. शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगरचा औरंगाबाद असा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. पण ते सध्या कायदा पाळत आहेत, आम्ही बेफाम आहोत. आम्ही संभाजीनगरच म्हणणार, बाळासाहेब हेच आमचा कायदा आहेत, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT