Satish Chavan News in Marathi, Satish Chavan criticize Chandrakant Patil, Supriya Sule News
Satish Chavan News in Marathi, Satish Chavan criticize Chandrakant Patil, Supriya Sule News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : नगरसेवका इतकीही किंमत नसलेले चंद्रकांत पाटील चर्चेत राहण्यासाठी बरळतात..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलेल विधान सध्या राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. (Ncp) `जमत नसेल तर घरी जाऊन स्वयंपाक करा`, असा सल्ला चंद्रकांत पाटी यांनी सुप्रिया सुळे यांना दिला होता. (Aurnagabad) यानंतर राष्ट्रवादीकडून तिखट प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी देखील चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. (Satish Chavan News in Marathi)

नगरसेवका इतकीही किमंत नसलेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे चर्चेत राहण्यासाठी बरळत असतात, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरुन भाजपला (Bjp) सुनावले होते. दिल्लीत कुणाच्या बैठका झाल्यानंतर मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याचा निकाल लागला, असे म्हणत सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या स्तरावर जात टीका केली होती. त्याला सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. आमदार सतीश चव्हा यांनी चंद्रकात पाटलांवर टीका करतांना म्हटले आहे की, भाजपा प्रदेशाध्यक्ष असूनही एखाद्या नगरसेवक इतकीही किंमत नसलेले चंद्रकांत पाटील यांची चर्चेत राहण्यासाठी काहीतरी बरळणे आणि नंतर तोंडावर पडणे ही जुनी सवय आहे.

सुप्रिया सुळे या स्वकर्तृत्वाने राजकारणामध्ये स्वतःचे नाव उंचावत आहेत, संसदेत महिलांचे प्रश्न मांडत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया ताईंवर बोलताना आपण सूर्याकडे बघून थुंकत आहोत हे लक्षात घ्यावे, असा टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT