Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

CM Shinde : जाऊद्या ना ते आता कशाला बोलता? अजितदादांविषयी प्रश्न विचारताच मुख्यमंत्री असं का म्हणाले..

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde News : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं विधान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिवेशनामध्ये बोलताना केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याच विषयावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी 'जाऊद्या ना ते आता कशाला बोलता?' असं म्हणत थेट बोलण्याचं टाळलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आज औरंगाबादमधील सिल्लोडच्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांनी केलेल्या विधानावरून भाजपच्या काही नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर ''जाऊद्या ना ते आता कशाला बोलता?...'' ''ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. पण बोलताना सर्वांनी माहिती घेऊन बोललं पाहिजे. बोलताना तारतम्य ठेवायला पाहिजे. एवढीच माझी इच्छा आहे'', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अजित पवार नेमकी काय म्हणाले होते?

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, असं अजित पवार हे शुक्रवारी हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना म्हणाले होते. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या विधानावर आक्रमक भूमिका घेतली. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली.

दरम्यान, त्यानंतर आज मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अजित पवार यांच्या या विधानाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यानंतर जाऊद्या ना ते आता कशाला बोलता? अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT