Ashok Chavan News Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : अशोक चव्हाणांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोण करतंय ? पुन्हा तोच प्रकार...

Maharashtra News : सार्वजनिक बांधकाममंत्री असतानाच्या त्यांच्या बनावट लेटरपॅडचा वापर करून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता.

Laxmikant Mule

Marathwada Congress News : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची बदनामी करण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. (Ashok Chavan News) मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात त्यांच्या नावाची दोन बनावट पत्रे तयार करण्यात आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांना दिली आहे. चव्हाण यांनी यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे.

ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असतानाच्या काळातील कोरे लेटरपॅड तयार करून त्यावर आपल्या नावाची बनावट पत्रे लिहिण्यात आल्याचे चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. (Congress) त्यांच्या नावाच्या बनावट पत्रांचा पहिला प्रकार 9 महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावे लिहिलेले ते बनावट पत्र मराठा आरक्षणाविषयी होते.

त्याबाबत चव्हाण यांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. दरम्यान, संबंधित व्यक्तींनी पुन्हा अशी दोन बनावट पत्रे तयार केली आहेत. त्यातील एक पत्र मराठा आरक्षणाबाबत, तर दुसरे पत्र धनगर आरक्षणाबाबत आहे. या दोन्ही खोट्या पत्रांमध्ये माझी भूमिका आरक्षणाविरोधी भासवण्यात आल्याचे चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी काळात अनेक निवडणुका असून, त्या अनुषंगाने माझ्याविषयी गैरसमज निर्माण करून बदनामी करण्याचे, राजकीयदृष्ट्या प्रतिमाहनन करण्याचे हे कारस्थान आहे. पुढील काळात देखील अशाच प्रकारची काही खोटी पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो, अशी शंकाही चव्हाण यांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.

पोलिसांना त्यांनी दोन बनावट पत्रांच्या प्रतही दिल्या आहेत. सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांनाच्या त्यांच्या बनवाट लेटरपॅडचा वापर करून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता.

आता पुन्हा तोच प्रकार समोर आल्याने चव्हाण यांनी त्यांची गंभीर दखल घेत पोलिसांना यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीचे अशोक चव्हाण हे अध्यक्ष होते. या सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने केली जाते. बनावट लेटरपॅडच्या प्रकरणामागे कोण आहेत ? याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही चव्हाण यांनी पोलिस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT