Haribhau Bagade, Vilas Autade, Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

Congress Vs BJP : हरिभाऊ बागडेंच्या मतदारसंघात काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी?

Phulambri Assembly constituency News : भाजपचे जेष्ठ नेते आणि राजस्थानचे राज्यपाल माजी आमदार हरिभाऊ बागडे यांचा बाल्लेकिल्ला अशी ओळख असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने चांगलीच रणनीती आखली आहे.

नवनाथ इधाटे

Phulambri Assembly constituency : भाजपचे जेष्ठ नेते आणि राजस्थानचे राज्यपाल माजी आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांचा बाल्लेकिल्ला अशी ओळख असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने चांगलीच रणनीती आखली आहे.

या मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची खासदारपदी निवड झाल्याने काँग्रेसच्या (Congress) दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघातील निवडणूक ही काँग्रेससाठी अस्तित्वाची असणार आहे.

एकीकडे फुलंब्री मतदारसंघ अनेक वर्ष भाजपच्या ताब्यात राहिला आहे. या मतदारसंघात सर्वाधिक आमदार होण्याचा मान हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी मिळवला आहे. मात्र, आता ते राजस्थानचे राज्यपाल झाल्याने भाजपकडून दुसऱ्या फळीतील पदाधिकारी तयारीला लागले आहेत.

तर दुसरीकडे बागडे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले डॉ. कल्याण काळे (Kalyan Kale) हे जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे सध्या या मतदारसंघात आमदार नाहीये. कल्याण काळे काँग्रेस पक्ष संघटनेवर भर देत आहेत. पक्षातील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आमदारकीची तयारी करू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेस या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक

सध्या या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये (Congress) अनेक जण इच्छुक आहेत. सर्वाधिक दावेदार म्हणून सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर त्या खालोखाल खासदार काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे, त्यानंतर पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे यांचेही नाव चर्चेत आहे. तर पाथ्री येथील शिक्षणमहर्षी द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांचे चिरंजीव वरून पाथ्रीकर यांनी देखील चाचपणी सुरु केली आहे.

काँग्रेस खासदारांसमोर पेच

जालना लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान डॉ. कल्याण काळे व विलास औताडे या दोघांनी मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत साटे लोटे केल्याची चर्चा आहे. खासदारकी काळेंना दिली तर आमदारकीला औताडे असतील असे समीकरण त्या बैठकीत ठरल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेससाठी सातत्याने एकनिष्ठेने काम करणारे संदीप बोरसे, वरून पाथ्रीकर हे देखील दावेदार आहेत. अशातच खासदार काळे यांचे बंधूजगन्नाथ काळे यांनी तयारी दर्शविल्याने खासदारांसमोर काळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT