Ambadas Danve on Nanded Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve on Nanded : कोणाचा वाढदिवस होता की डॉक्टर गर्भवती महिलेला... ; दानवेंचा सवाल?

अनुराधा धावडे

Nanded Hospital News : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात गेल्या ४८ तासात ३१ मृत्यू झाल्याने राजकारण चांगलचं तापलं आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी यावर भाष्य करत शिंदे सरकाला धारेवर धरलं आहे. कोणत्या डॉक्टरचा वाढदिवस होता.

त्यासाठी एका गर्भवती महिलेचे सिजर सोडून कोण कोण तिथे गेले, असा आरोप अंबादास दानवें यांनी केला आहे. तसेच, या सर्वाची चौकशी झालीच पाहिजे, त्याच्यावर कारवाई देखील केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नांदेड रुग्णालयातील मृत्यूंबाबत अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. " आम्ही स्वत : डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की समोर पेशंट तडफडतोय पण आमच्याकडे औषधेच नसतील तर आम्हाला त्यांना बाहेरुन औषधे आणण्यासाठी रेफर करावचं लागणार. एका कुटुंबाने ७० हजार रुपयांचे औषधे बाहेरुन खरेदी केली.

या कुटुंबाने खरेदी केली, पण त्यात डॉक्टरांचाही निष्काळजीपणा आहे. कोणत्या डॉक्टरचा वाढदिवस होता. त्यासाठी एका गर्भवती महिलेचे सिजर सोडून कोण कोण तिथे गेले, याची चौकशी झाली पाहिजे, असही त्यांनी म्हटलं आहे. पण जर कोणी 'डीन'लाच सफाई करायला लावत असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. असंही दानवेंनी म्हटलं आहे.

रुग्णालयात पुरेसा औषधसाठा होता, कर्मचारीही होते. असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असा सवाल त्यांना विचारला असता. दानवे म्हणाले, मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. या रुग्णालयाच्या अधिष्ठाता (Dean) ची नेमणूक राज्य सरकारनेच केली आहे ना, स्वत : डीन हेच जर हॉस्पिटलमध्ये औषधे नसल्याचं सांगितलं.

औषधाच्या मागण्याचे पेपर्सही माझ्याकडे आहेत. हाफकिनला साडेतीन कोटींच्या औषधांची मागणी गेल्यावर्षी करण्यात आली होती. ती औषधे अद्यापही आली नाहीत. (Nanded Death Case) तर आजच्या वर्षीची कशी येतील,असा सवालही दानवेंनी उपस्थित केला आहे. 4 कोटी डपीसी'ने दिले परंतु अजून औषधी खरेदी का केली नाही? त्याला वैद्यकीय शिक्षण खात्याचे सेक्रेटरी एक-एक वर्ष मान्यता देत नाहीत. डीपीसी पैसे देत असेल तर त्याला एक-एक वर्षे वेळ का लागतो, असा सवालही दानवेंनी उपस्थित केला आहे.

हे फक्त नांदेडमध्येच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी हा प्रकार सुरु आहे. यात उच्च स्तरावर जे अधिकारी काम करतात, त्याचीही चौकशी झाली पाहिजे. औषध खरेदीच्या फाईल एक एक वर्षे का थांबतात. बाकीची कामे जर टेंडर नसताना होत असतील तर औषधे का थांबतात. टेंडर शिवाय औषधांची मागणी करावी असे मी म्हणत नाही. पण बाकीची काम टेंडर शिवाय होत असतील तर औषधांची खरेदीही व्हायला हवी, असं दानवेंनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT