Sanjay Shirsat On CM Shinde News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On CM Shinde : मुख्यमंत्र्यांना काय झाले ? शिरसाट म्हणतात बळजबरीने रुग्णालयात दाखल करणार...

Maharashtra News : मुख्यमंत्र्यांना नेमकं झालायं काय ? अशी चर्चा या निमित्ताने राज्यभरात सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Shivsena News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. चोवीस तास ते काम करतात, याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत आहे. (Sanjay Shirsat On CM Shinde News) त्यांची प्रकृती अत्यंत खराब आहे, आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगतोय. पण ते ऐकत नाही, १५ ऑगस्टनंतर आम्ही त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल करणार आहोत, असे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना नेमकं झालायं काय ? अशी चर्चा या निमित्ताने राज्यभरात सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलतांना शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती प्रचंड खराब असून त्यांना जबरदस्तीने अ‍ॅडमिट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे २४ तास काम करतात हे महाराष्ट्र जाणतो. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरकडे जाण्याची विनंती केली आहे.

१५ ऑगस्टनंतर त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. (Shivsena) आम्ही त्यांच्या जवळ राहतो, आम्हाला माहिती आहे, असेही शिरसाट म्हणाले. शिंदे यांनी तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रकृती बरी नाही म्हणून ते गावात जाऊन एकदिवस आराम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते लंडनला गेले नाहीत, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.

संजय राऊत यांच्या टीकेला आता कुणी गांभीर्याने घेत नाही, ते काहीही बडबड करतात. खरतरं राऊत यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो, त्यांना उद्धव ठाकरे यांनी तातडीने हाॅस्पीटलमध्ये भरती केले पाहिजे. नसता उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात भरती व्हायची वेळ येईल, अशी टीकाही शिरसाट यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT