Congress Leader Ashok Chavan News, Aurangabad
Congress Leader Ashok Chavan News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : बोम्मईंच्या ट्विट प्रकरणी सरकारने बोटचेपी, नरमाईची भूमिका का घेतली ?..

सरकारनामा ब्युरो

Winter Session News : हिवाळी अधिवेशनातील पहिला दिवस गाजला तो महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कर्नाटक सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. Congress काॅंग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण यांनी देखील याच मुद्यावरून राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, त्या वादग्रस्त ट्वीटचे प्रकरण दाबण्याच्या कर्नाटक सरकारच्या प्रयत्नांना जणू महाराष्ट्र सरकारही मदत करते आहे. (Karnataka) राज्यातील सरकारने याबाबत नरमाईची आणि बोटचेपी भूमिका का घेतली आहे? याचे उत्तर महाराष्ट्राला मिळाले पाहिजे.

सीमावाद पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतली व सामोपचाराचा सल्ला दिला. पण महाराष्ट्राची भूमिका नेहमीच सामंजस्याची राहिली आहे. चिथावणी देण्याचे काम तर कर्नाटककडून सुरू आहे. तेथील मुख्यमंत्री चिथावणीखोर भाषा वापरतात. तरीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात नाही.

त्या हॅंडलवर अजूनही कर्नाटक सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या शासकीय निर्णयांची माहिती दिली जाते आहे. ते ट्वीटर हॅंडल फेक असेल तर मग आतापर्यंत महाराष्ट्राबाबतचे ते आक्षेपार्ह ट्वीट डिलिट का करण्यात आले नाहीत? ते अकाऊंट अजूनही सक्रिय कसे आहे? बोम्मई यांनी केलेल्या ट्वीट्सची भाषा आक्षेपार्ह होती. त्यावर प्रक्षोभ उडाल्यानंतर ते ट्वीटर हॅंडलच फेक असल्याचा खुलासा करण्यात आला.

परंतु, बोम्मई यांचे ते ट्वीटर हॅंडल जानेवारी २०१५ पासून सक्रिय आहे. ट्वीटरने त्याला व्हेरिफाय देखील केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून केलेल्या चिथावणीखोर ट्वीट्सबाबत महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असून, या गंभीर प्रकरणावर राज्य सरकार गप्प का आहे? असा सवाल देखील चव्हाण यांनी उपस्थितीत केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT