औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार अखेर आज झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री मिळाले. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपकडून अतुल सावे यांची वर्णी नव्या मंत्रीमंडळात लागली. पण दावेदारी आणि चर्चेत असलेल्या (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांचा पत्ता मात्र ऐनवेळी कट झाला. मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि शिरसाट यांना डावलल्याची संधी साधत (Shivsena) शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकार व आमदार शिरसाट यांना चांगलाच टोला लगावला आहे.
दानवे यांनी एक ट्विट करत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ विस्तारासाठी मोहरमचा मुहूर्त का निवडला? असा चिमटा काढला आहे.(Marathwada) शिवाय घोटाळेबाज मंत्र्यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन आपल्या सरकारची वाटचाल कोणत्या दिशेने असेल हे देखील स्पष्ट केल्याची टीका केली आहे.
शिवाय आमदार संजय शिरसाट यांच्या दुःखावर मीठ चोळत नाराजांच्या दुःखाला लवकरच वाचा फुटो, असा टोला देखील लगावला आहे. संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू होते. दोघांनीही एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टी देखील चव्हाट्यावर आणल्या होत्या. आता शिरसाट यांचा पत्ता कट झाल्याची संधी साधत दानवेंनी त्यांना टोला लगवाला आहे.
दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, व्वा! हिंदुत्ववादी शिंदे-फडणवीस सरकारने 'मोहरम'चा मुहूर्त साधत मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. घोटाळेबाजांना मंत्रिमंडळात स्थान देऊन या सरकारने आपली भविष्यातील वाटचाल स्पष्ट केली आहे. नवनिर्वाचित मंत्र्यांना शुभेच्छा! नाराजांच्या दुःखाला लवकरच वाचा फुटो. आता दानवे यांच्या या खोचक ट्विटनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.