Dhnanjay Munde, News Beed Sarkarnama
मराठवाडा

Dhnanjay Munde On Beed APMC : सरकार निवडणुका का घेत नाही ? याचे गुपित आजच्या निकालात दडले आहे..

Beed News : विक्रमी मतांनी राष्ट्रवादीचा विजय होतोय, हे आता विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : बीड जिल्ह्यातील आज निकाल लागलेल्या सहापैकी पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) झेंडा फडकला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना याचे श्रेय असल्याचे धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. हा निकाल सरकारच्या विरोधात आहे, त्यामुळे सरकार निवडणुका का घेत नाही? याचे गुपत आजच्या निकालात दडले आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

बीड जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकांमधील यश हे महाविकास आघाडीसाठी मोठे यश समजले जाते. यावरून जिल्ह्यात पुन्हा एकदा भाऊ धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी बहिण पंकजा मुंडे यांना मात दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी मात्र पकंजा यांच्यावर थेट टीका करणे टाळले.

धनंजय मुंडे म्हणाले, संपूर्ण बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. सहा पैकी पाच बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. (Beed News) मोठ्या फरकाने आमचा विजय झाला आहे. याबद्दल मी बीड जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे आभार मानतो. अंबाजोगाई, बीड, परळी, गेवराई, आणि वडवणीत आमचे वर्चस्व कायम राहिले. (Marathwada) केज बाजार समिती वगळता आमचा जिल्ह्यात झालेला हा विजय ऐतिहासिक आहे.

विक्रमी मतांनी राष्ट्रवादीचा विजय होतोय, हे आता विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. ह

माल मापाड्यांमध्ये हा ट्रेंड असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये परिवर्तन निश्चित होईल. कृषि उत्पन्न बाजार समिती शेकऱ्यांशी निगडित संस्था आहे. त्यामुळे इथे लागलेला निकाल हा सरकारच्या विरोधात आहे.

सरकार निवडणुका का घेत नाही याचे गुपित या आजच्या निकालात दडले आहे, याचा पुनरुच्चार देखील मुंडे यांनी केला. नगरपरिषद , जिल्हा परिषद निवडणुका झाल्या पाहिजेत. राज्यातील सत्तांतर नंतरची ही पहिलीच निवडणूक आणि त्यात संपुर्ण राज्यात महाविकास आघाडीला घवघवित यश मिळाले, याबद्दल समाधान आणि आनंद वाटत असल्याचेही मुंडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT