Arjun Khotkar News
Arjun Khotkar News Sarkarnama
मराठवाडा

३१ जुलैला अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रेवश करणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीनंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता शिंदे गटात सामील होण्याचा त्यांंचा मुहुर्त ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या ३१ जुलैला खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार, असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून खोतकर हे दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. तसंच भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबतही त्यांच्याशीही भेट झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीपासून अर्जुन खोतकर शिंदे गटात कधी प्रवेश करणार याची चर्चा सुरु होती. पण याबाबत त्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नव्हता. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या जालना दौऱ्यात अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. काही वेळापूर्वी अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांनी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी चर्चा केली.

तीन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना, "माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसणारच. संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच, अशी प्रतिक्रीया अर्जुन खोतकर यांनी दिली होती. त्यामुळे ईडी कारवाईमुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चां राजकीय वर्तुळात सुरु होत्या. मात्र या केवळ अफवा असल्याचे सांगत फोटोवरुन अंदाज बांधू नका, मी अद्यापही शिवसेनेत आहे, असा खुलासा त्यांनी केला.

- काय आहे जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा ?

दरम्यान, खोतकर यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांची मालमत्ताही ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. 1984 मध्ये उभारण्यात आलेला जालना सहकारी साखर कारखाना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीज कंपनीच्या मालकीचा आहे. या कारखान्याचे तब्बल 10 हजार सभासद आणि मोठी जमीनही आहे. अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जुगलकिशोर तापडिया यांना हा कारखाना कागदोपत्री विकण्यात आला. मात्र, त्यासाठी लागणारा पैसा अर्जुन शुगर्सकडून देण्यात आला. जुगलकिशोर तापडिया यांनी स्वत:च त्यांच्या व्यवहारविषयक कागदपत्रात तसं म्हटलही आहे. याशिवाय या जमिनीच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. माणिकराव जाधव यांनी या प्रकरणाविरोधात पहिली तक्रार केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT